काही काळापूर्वी ओंकार राऊतबद्दलचा एक किस्सा खूपच व्हायरल झाला होता. ओंकारने शोची सूत्रसंचालक प्राजक्ता माळीला प्रपोज केल्याच्या चर्चा होत्या. अखेर, ओंकारने एका मुलाखतीत या चर्चांवरचे मौन सोडले आहे.
ओंकार राऊतने नुकतीच 'कविरत स्टुडिओ'ला मुलाखत दिली. यावेळी त्याला 'लग्न कधी करणार आहेस?' असा प्रश्न विचारला गेला. यावर ओंकारने आपल्या खास अंदाजात उत्तर दिले. तो म्हणाला, "माहित नाही... कोणाकडे मुलगी असेल तर सांगा. मी तर 'अनुपम'वर पण रजिस्टर करणार आहे! माझे बाबा मला म्हणाले, सगळ्या ठिकाणी आहेस, तर मग अनुपमवर पण ये ना... माहित नाही मला, पण होईल लवकरच."
advertisement
यावेळी त्याने प्राजक्ता माळीला प्रपोज करण्याच्या चर्चेवरही खुलासा केला. तो म्हणाला, "नाही, प्रपोज केलंय मी... पण ते खूप नॅचरल होतं, आणि तिच्याकडूनही ते जास्त चांगलं वर्क आऊट झालं."
ओंकारने स्पष्ट केले की, 'हास्यजत्रा'मध्ये त्याचे आणि प्राजक्ताचे नोकझोक असलेले एक स्कीट होते. या स्कीटमध्ये ओंकार प्राजक्ताला टोकत असतो. ओंकार म्हणाला की, त्याचे डायलॉग स्क्रिप्टेड असले तरी, प्राजक्ताकडून येणारे रिॲक्शन अधिक चांगले वर्क आऊट होतात. "मी नुसता बोलतोय आणि ती शांत बसलीये, असं झालं असतं, तर ते एवढं वर्क नसतं झालं. ती पण चांगलं रिॲक्ट करते, त्यामुळे मजा येते नोकझोक करायला."
प्राजक्तासोबतच्या मैत्रीबद्दल बोलताना ओंकारने तिचे मन भरून कौतुक केले. तो म्हणाला, "ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे. प्राजक्ता माळी खूप काळजी घेणारी मुलगी आहे. तिला तिच्या आजूबाजूच्या लोकांची, तिच्या मित्रांची खूप काळजी असते. जर तिला कुठून लांबून समजलं की ह्याचं काही बिनसलंय, तर ती स्वतःहून येते चौकशी करायला. ती मनाने खूप चांगली मुलगी आहे!"
