TRENDING:

Salim Khan: सलीम खान यांच्या तब्येतीबाबत रुग्णालयातून आली महत्त्वाची अपडेट, सलमानसह संपूर्ण कुटुंब रुग्णालयात!

Last Updated:

Salim Khan Health Update: ९० वर्षीय सलीम खान यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना थेट आयसीयूमध्ये (ICU) हलवण्यात आले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज लेखक सलीम खान यांची प्रकृती बिघडल्याने सध्या संपूर्ण बॉलिवूड चिंतेत आहे. मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांना मुंबईतील वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात तातडीने भरती करण्यात आले. ९० वर्षीय सलीम खान यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना थेट आयसीयूमध्ये (ICU) हलवण्यात आले आहे.
News18
News18
advertisement

रुग्णालयाने दिलं हेल्थ अपडेट

सलीम खान यांच्या प्रकृतीबाबत लोकांमध्ये अनेक अफवा पसरत असताना, लीलावती रुग्णालय प्रशासनाने एक अधिकृत पत्रक जारी करून परिस्थिती स्पष्ट केली आहे. रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, सलीम खान यांना त्यांचे फॅमिली डॉक्टर संदीप चोप्रा यांनी तातडीने रुग्णालयात आणले. प्रसिद्ध डॉक्टर जलील पारकर यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञांची एक मोठी टीम त्यांच्यावर उपचार करत आहे, ज्यामध्ये न्यूरोलॉजिस्ट, कार्डियोलॉजिस्ट आणि न्यूरोसर्जन यांचा समावेश आहे.

advertisement

सर्वात दिलासादायक बाब म्हणजे, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. रुग्णालयाने पुढे विनंती केली आहे की, खान कुटुंबाच्या खासगीपणाचा आदर राखला जावा. उद्या सकाळी ११ वाजता कुटुंबाच्या संमतीने पुन्हा एकदा सविस्तर मेडिकल अपडेट प्रसिद्ध केले जाईल.

'एक मूल वाढवण्यापेक्षा...', प्रवाहाच्या विरुद्ध जात 'प्रसिका'ने घेतला धाडसी निर्णय, 'बाळ कधी?' विचारणाऱ्यांना जबरदस्त चपराक

advertisement

सलमान खानने अर्ध्यावर सोडलं शूटिंग

आपल्या वडिलांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सलमान खानला जेव्हा ही बातमी कळाली, तेव्हा त्याने क्षणभरही विचार न करता आपल्या आगामी चित्रपटाचे शूटिंग आणि सर्व महत्त्वाचे प्रोजेक्ट्स थांबवले. सकाळीच सलमान अत्यंत चिंतेत रुग्णालयात दाखल झाला. त्याच्यापाठोपाठ अरबाज खान, अलवीरा आणि अर्पिता देखील वडिलांच्या सोबतीला पोहोचले आहेत. सलमानच्या चेहऱ्यावरील तणाव पाहून परिस्थिती संवेदनशील असल्याचं स्पष्ट होत होतं.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
ज्वेलरी बॉक्स मिळतोय फक्त 120 रुपयांपासून, मुंबईत हे आहे लोकेशन
सर्व पहा

जावेद अख्तर यांच्यासोबत मिळून 'शोले', 'जंजीर' आणि 'दीवार' यांसारखे अजरामर चित्रपट लिहिणारे सलीम खान हे खऱ्या आयुष्यातही खूप शिस्तबद्ध आणि खंबीर मानले जातात. ९० वर्षीय सलीम यांनी याआधीही अनेक आजारांवर मात केली आहे. सोशल मीडियावर सध्या चाहत्यांकडून आणि सिनेसृष्टीतील कलाकारांकडून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Salim Khan: सलीम खान यांच्या तब्येतीबाबत रुग्णालयातून आली महत्त्वाची अपडेट, सलमानसह संपूर्ण कुटुंब रुग्णालयात!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल