TRENDING:

OTT : स्वातंत्र्य दिनी धमाका! राजकीय डावपेच ते थ्रिलर; 15 ऑगस्टला ओटीटीवर येणार धमाकेदार मूव्ही-सीरीज!

Last Updated:

OTT: घरबसल्या मनोरंजनाचा खजिना देण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मही सज्ज झाले आहेत. स्वातंत्र्य दिनी बरेच मूव्ही-सीरीज रिलीज होणार आहेत. त्यामुळे वीकेंडला तुम्ही याचा आनंद घेऊ शकता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : स्वातंत्र्यदिनाचा आठवडा सिनेमाप्रेमींसाठी खरोखरच खास ठरणार आहे. मोठ्या पडद्यावर ‘वॉर 2’ आणि ‘कुली’ सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट गाजत असताना, घरबसल्या मनोरंजनाचा खजिना देण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मही सज्ज झाले आहेत. साहस, हेरगिरी, अॅक्शन, हॉरर आणि राजकीय थ्रिलर सगळं काही या आठवड्यात एकाच पॅकेजमध्ये मिळणार आहे.
 15 ऑगस्टला ओटीटीवर येणार धमाकेदार मूव्ही-सीरीज!
15 ऑगस्टला ओटीटीवर येणार धमाकेदार मूव्ही-सीरीज!
advertisement

15 ऑगस्ट रोजी ओटीटीवर अनेक सिनेमे वेब सीरीज धडकणार आहेत. याची लिस्ट जाणून घेऊया ज्यामुळे तुमचा वीकेंड एकदम धमाकेदार होईल आणि तुमच्याकडे घरबसल्या पाहण्यासाठी अनेक ऑप्शन असतील.

कुटुंबासोबत चुकूनही पाहू नका! बोल्डनेसने भरलेत हे साऊथ सिनेमे, पाचव्याने तर मर्यादाच ओलांडल्या

‘सारे जहाँ से अच्छा’

13 ऑगस्टला डिज्नी+ हॉटस्टारवर प्रतीक गांधी यांची ‘सारे जहाँ से अच्छा’ ही थ्रिलर मालिका प्रदर्शित होईल. यात प्रतीक गांधी एका भारतीय गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहेत, जो शत्रूचे अणु तळ उद्ध्वस्त करण्यासाठी सीमा ओलांडतो. देशभक्तीची भावना जागवणारी ही कथा सनी हिंदुजा, कृतिका कामरा, तिलोत्तमा शोम आणि रजत कपूर यांच्या दमदार अभिनयाने अधिक रंगतदार होणार आहे.

advertisement

‘तेहरान’

14 ऑगस्टला ZEE5 वर जॉन अब्राहमचा ‘तेहरान’ प्रदर्शित होणार आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही कथा एका भारतीय एसीपी (राजीव कुमार) भोवती फिरते, जो आंतरराष्ट्रीय कटात अडकतो. मानुषी चिल्लर आणि नीरू बाजवा यांच्या भूमिका देखील लक्षवेधी आहेत. अॅक्शन, सस्पेन्स आणि धमाकेदार सीनसाठी हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे.

‘डार्कनेस’

14 ऑगस्टला अमेझॉन प्राइमवर येणारी ‘डार्कनेस’ ही वेबसीरिज अलौकिक घटनांनी भरलेली आहे. हरवलेल्या मुलीचा शोध घेण्यासाठी इन्स्पेक्टर कल्पना कदम आणि वैद्यकीय विद्यार्थी जय जी-जान लावतात. प्राजक्ता कोळी, सुरवीन चावला, प्रिया बापट आणि करणवीर मल्होत्रा यांच्या अभिनयाने ही मालिका अंगावर काटा आणणारी ठरेल. निर्मिती फरहान अख्तर यांनी केली असून दिग्दर्शन राघव दार यांनी केले आहे.

advertisement

‘नाईट ऑलवेज कम्स’

15 ऑगस्टला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणारा हा क्राइम थ्रिलर एक हृदयस्पर्शी पण धोकादायक प्रवास दाखवतो. आपलं घर वाचवण्यासाठी एक मुलगी सर्वस्व पणाला लावते, आणि या प्रवासात ती गुन्हेगारी जगात पाऊल ठेवते. अमेरिकन इंडी सिनेमाचा टच आणि थरारक कथा हे या चित्रपटाचं मुख्य आकर्षण आहे.

दरम्यान, या स्वातंत्र्यदिनी सिनेमाप्रेमींसाठी थिएटर आणि ओटीटी दोन्हीकडे धमाकेदार पर्याय आहेत. घरात बसून पॉपकॉर्नसोबत देशभक्ती, थरार, अॅक्शन आणि हॉररचा आस्वाद घ्या.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
OTT : स्वातंत्र्य दिनी धमाका! राजकीय डावपेच ते थ्रिलर; 15 ऑगस्टला ओटीटीवर येणार धमाकेदार मूव्ही-सीरीज!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल