TRENDING:

ना सेक्रेड गेम, ना मिर्जापूर; 'ही' आहे भारतातील सर्वात महागडी वेब सीरिज; पाण्यासारखा खर्च केलाय पैसा

Last Updated:

ही वेब सीरिज बॉलिवूड सिनेमांच्या बजेटपेक्षा महागडी जास्त आहे. शाहरूखनच्या डंकी सिनेमाचं बजेट 85 कोटी रूपये आहे. तर एनिमल हा सिनेमा 100 कोटींमध्ये बनवण्यात आला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई,25 डिसेंबर : ओटीटी प्लॅटफॉर्म हे सध्या मनोरंजनाचं प्रमुख माध्यम बनत चाललं आहे असं म्हटलं तर हरकत नाही. ओटीटी माध्यमांकडे वळू लागलेल्या कलाकारांची संख्या देखील वाढू लागली आहे. इतकंच नाही तर ओटीटीवर काम करण्यासाठी कलाकार दुप्पट मानधन देखील आकारत आहेत. मोठ्या पडद्याप्रमाणेच ओटीटीसाठी देखील बिग बजेट वेब सीरिज तयार होत आहेत. भारतातील सर्वात महागड्या वेब सीरिजसमोर अँनिमल आणि डंकी देखील फिके पडतात. या वेब सीरिजमध्ये काम करणाऱ्या प्रमुख कलाकारानं तगडं मानधन देखील आकारलं होतं.
भारतातील सर्वात महागडी वेब सीरिज
भारतातील सर्वात महागडी वेब सीरिज
advertisement

‘रुद्र: दि एज ऑफ डार्कनेस’ चं बजेट हे बॉलिवूड सिनेमांच्या बजेटपेक्षा जास्त आहे. शाहरूखनच्या डंकी सिनेमाचं बजेट 85 कोटी रूपये आहे. तर एनिमल हा सिनेमा 100 कोटींमध्ये बनवण्यात आला. आमिर खानचा लाल सिंह चड्ढा हा सिनेमा 180कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला. तर सनी देओलचा गदर 2 हा सिनेमा अवघ्या 60 कोटींमध्ये तयार करण्यात आला आहे.

advertisement

हेही वाचा - मोठी बातमी! 'सिंघम 3' च्या सेटवर अजय देवगणचा अपघात; अभिनेत्याच्या दुखापतीमुळं चित्रपटाचं शूटिंग कॅन्सल!

काही दिवसांआधीच आलेल्या सॅम बहादूर या सिनेमाबद्दल बोलायचं झाल्यात. हा सिनेमा गदर 2 पेक्षा कमी म्हणजेच 50 कोटीच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. तर सलमान खानचा किसी का भाई किसी की जान सिनेमाचं बजेट 132 कोटी रूपये होते. ‘रुद्र: दि एज ऑफ डार्कनेस’पेक्षा कमी बजेट हे सिनेमे तयार करण्यात आले होते.

advertisement

ब्रिटिश शो लूथरवर आधारित ‘रुद्र: दि एज ऑफ डार्कनेस’ ही सध्याची ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सर्वात महागडी वेब सीरिज आहे. डिज्नी प्लस हॉटस्टारवर ही रिलीज पाहण्यासाठी उपलब्ध आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या वेब सीरिजचं बजेट 200 कोटी रूपये आहे. भारतातील सर्वात बिग बजेट वेब सीरिजच्या लिस्टमध्ये या सीरिजचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार या सीरिजमध्ये काम करण्यासाठी अभिनेता अजय देवगण यानं 125 कोटी रूपये मानधन आकारलं होतं.

advertisement

2022 साली ही सीरिज डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज झालेल्या ‘रुद्र: दि एज ऑफ डार्कनेस’ या वेब सीरिजमध्ये अभिनेता अजय देवगण प्रमुख भूमिकेत आहे. तर त्याच्याबरोबर राशी खन्ना, ईशा देओल, अतुल कुलकर्णी आणि आशिष विद्यार्थी हे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

मराठी बातम्या/मनोरंजन/
ना सेक्रेड गेम, ना मिर्जापूर; 'ही' आहे भारतातील सर्वात महागडी वेब सीरिज; पाण्यासारखा खर्च केलाय पैसा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल