दहीहंडीचं हे अजरामर गाणं 1963 साली आलेल्या 'ब्लफ मास्टर' या सिनेमातील आहे. हे गाणं ज्यांच्या व्हिजनमधून प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं ते होते दिग्दर्शक, निर्माते मनमोहन देसाई. दहीहंडीचं अजरामर गाणं देणारे दिग्दर्शक मनमोहन देसाई यांनी बॉलिवूडला क्वालिटी चित्रपट दिले. त्यांच्या सिनेमांनी बॉलिवूडमधील एक काळ गाजवला. त्यांच्यासारखे कल्ट सिनेमे आजवर कोणीही तयार करू शकले नाहीत.
advertisement
मनमोहन देसाई यांनी त्यांच्या 29 वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत 20 चित्रपट केले. त्यापैकी 13 सुपरहिट होते. मनमोहन देसाई हे अशा दिग्दर्शकांपैकी एक आहेत ज्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला एक नवीन आयाम दिला. राज कपूर, शम्मी कपूर, शशी कपूर, अमिताभ बच्चन सारख्या कलाकारांसोबतही काम केले.
हिंदी सिनेसृष्टीत मोलाचं योगदान देणारे दिग्दर्शक मनमोहन देसाई यांच्या आयुष्य मात्र अनेक चढउतारांनी भरलेलं होतं. त्यांच्या आयुष्याचा शेवट चटका लावणारा होता. त्यांच्या मृत्यूचं रहस्य आजही गूढ आहे.
मनमोहन देसाई यांनी जीवनप्रभा गांधींशी लग्न केलं होतं. पण 1979 साली त्यांच्या पत्नीचं निधन झालं. पत्नीच्या निधनानंतर मनमोहन देसाई एकटे पडले. त्यानंतर 1992 साली त्यांनी वयाच्या 55व्या वर्षी नंदाशी साखरपुडा केला होता. असं म्हटलं जातं की मनमोहन देसाई लग्नापूर्वीच नंदावर प्रेम करत होतं. पण नंदाच्या लाजाळू स्वभावामुळे त्यांनी कधीही त्यांचं प्रेम व्यक्त केलं नाही. मनमोहन देसाईंच्या मृत्यूनंतर नंदाने लग्न केले नाही.
1 मार्च 1994 साली मनमोहन देसाईंच्या मृत्यूची बातमी संपूर्ण बॉलिवूडला हादरवून सोडली. वृत्तानुसार, घराच्या बाल्कनीतून पडून त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी त्यांनी आत्महत्या केल्याच्या बातम्याही आल्या होत्या. त्यांच्या मृत्यूचे रहस्य अजूनही एक गूढ आहे. काही वृत्तांनुसार मनमोहन देसाई यांचे अनेक चित्रपट फ्लॉप झाले होते. त्याच वेळी, ते बराच काळ पाठदुखीने ग्रस्त होते.
एक वर्ष आधीच 5 एप्रिल 1993 साली अभिनेत्री दिव्या भारतीचाही असाच बाल्कनीतून पडून मृत्यू झाला होता. तिच्याही मृत्यूचं गूढ आजवर उकलू शकलं नाही.