'तुम्ही पळून जाऊन लग्न करा', जेव्हा होणाऱ्या सासऱ्यांनीच गिरिजा ओकला दिला होता सल्ला, अभिनेत्रीच्या लग्नाचा भन्नाट किस्सा

Last Updated:
Girija Oak Father In Law Adviced : लव्ह मॅरेज म्हटलं की मोठ्यांची परवानगी घेणं, त्यांना मनवणं हे सगळे प्रकार मुलगा आणि मुलगीला करावेच लागतात. अनेकदा घरचे तयार होतात पण लग्न कसं करायचं हा विषय आल्यानंतर अनेकांचे मतभेद होतात. अभिनेत्री गिरिजा ओकच्या लग्नातही असंच काहीसं घडलं होतं. तेव्हा तिच्या सासऱ्यांनी तिला थेट पळून जाऊन लग्न करण्याचा सल्ला दिला होता. अभिनेत्रीनं एका मुलाखतीत हा भन्नाट किस्सा सांगितला.
1/8
द अनुरूप शोला दिलेल्या मुलाखतीत बोलताना गिरीजानं तिच्या लग्नाचा किस्सा सांगितला. सुह्रत गोडबोले असं गिरिजाच्या नवऱ्याचं नाव आहे.

advertisement
2/8
सुह्रत हा दिग्दर्शक, अभिनेते श्रीरंग गोडबोले यांचा मुलगा आहे. वयाच्या 22 व्या वर्षी गिरीजानं सुह्रतशी लग्न केलं. त्याच्या लग्नावेळी एक रंजक किस्सा घडला होता.

3/8
गिरीजा आणि सुह्रत यांनी त्यांच्या नात्याबद्दल जेव्हा घरी सांगितलं तेव्हा सगळ्यांना त्यांना होकार दिला. पण लग्नात व्हायफळ खर्च करणं दोघांनाही मान्य नव्हतं. कोर्टात जाऊन कोर्ट मॅरेज करायचं असा दोघांचा विचार होता.

4/8
लग्नासाठी लागणारे पैसे आम्हाला द्या आम्ही युरोप ट्रिप करून येतो असं गिरीजा आणि सुह्रत यांनी आई-वडिलांना सांगितलं होतं. पण गिरीजाचे कुटुंबीय मानायला तयार नव्हते.

5/8
तेव्हा गिरीजाचे सासरे श्रीरंग गोडबोले यांनी ' तुम्ही पळून जाऊन लग्न करा म्हणजे कोणालाच खर्च नको!' असा मजेशीर सल्लाही दिला होता.

6/8
स्पेशली गिरीजाच्या घरी खूप पारंपरिक वातावरण असलेले लोक आहेत. फार कन्व्हेन्शनल विचारांचे आहेत. गोडबोले अजिबात तसे नाहीत. त्यामुळे गिरीजाच्या आईला तिचं लग्न साग्रसंगीत करायचं होतं. त्यामुळे लग्नावेळी यावर खूप मतांतरं झाली होती.

7/8
गिरीजानं सांगितलं, गिरीजा म्हणाली,
गिरीजानं सांगितलं, गिरीजा म्हणाली, "माझे आणि बाबा वेगळे झाले होते.त्यांची दोन लग्न झाली होती आणि त्यांच्या दोन वेगळ्या फॅमिली होत्या. समोर चार गोडबोले होते इथे माझे वडील, त्यांची बायको, त्यांची मुलगी, बायकोच्या घरातील आणखी दोन मुलं. इथे माझी आई, तिचा नवरा, तिची दोन मुलं, तिचा भाचा असे माझ्याकडे खूप लोक होते."
advertisement
8/8
लग्नाविषयी बोलणी कोणाबरोबर करायची असा प्रश्न आल्यानंतर गिरीजानं माझ्याशीच बोला असं सासरकड्यांना सांगितलं होतं.

OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement