भोजपुरी स्टार निरहुआ म्हणजेच दिनेश लाल यादव गायनापासून ते अभिनयापर्यंत, त्यांनी अनेक चाहत्यांची मने जिंकली आहेत. मात्र त्यांच्या आयुष्यात एक असा प्रसंग घडला जो ते आजही विसरू शकत नाहीत.
काजोल की राणी मुखर्जी? दोन्ही बहिणींमध्ये कोण आहे सर्वात जास्त श्रीमंत
2012 साली प्रदर्शित झालेल्या गंगा देवी या चित्रपटाने निरहुआच्या कारकिर्दीत मोठा टप्पा गाठला. कारण या चित्रपटात त्यांना दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली होती. पहिल्यांदा या दोघांसमोर अभिनय करणे हे त्यांच्या दृष्टीने स्वप्नवत होते.
advertisement
निरहुआ आठवण सांगताना म्हणतात, "अमिताभ सर खूप साधे आहेत. ते सेटवर विनोद सांगून सगळं वातावरण हलकं करायचे. माझ्या गाण्यांबद्दल बोलायचे. त्यांच्यासोबत काम करणे म्हणजे जादुई अनुभव होता." पण याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एक असा किस्सा घडला ज्याने निरहुआ दचकलाच. एका सीनमध्ये त्याला पत्नीच्या भूमिकेत असलेल्या पाखी हेगडेला थप्पड मारायची होती. त्यानंतर आईच्या भूमिकेत असलेल्या जया बच्चन यांना मुलाला फटकारायचं आणि काठीने मारायचं होतं.
या वेळी जयाजींनी अभिनयात पूर्णपणे रंगून खरोखरच निरहुआला काठीने मारलं. ते सांगतात, "मला दोनदा जोरात मार लागला. मी त्यांना विचारलं, ‘तुम्ही खरंच मारलंत का?’ त्यावर त्या म्हणाल्या, ‘तुम्ही माझ्या सुनेला का मारलं?’ मी हसत म्हणालो, ‘तो फक्त सीन होता.’" जया बच्चन यांचा थोडा कडक आणि पटकन रागावणारा स्वभाव आधीपासूनच ओळखला जातो. त्याचे प्रत्यंतर निरहुआलाही या प्रसंगात आले. मात्र त्याने हे मनावर घेतले नाही. उलट तो म्हणतो, “हो, मला दुखापत झाली, पण मी ते आशीर्वादासारखं घेतलं. कारण जगात किती लोकांना अमिताभ सर आणि जयाजींसोबत काम करण्याची संधी मिळते?”