एकीकडे आराध्याच्या आई बाबांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु आहेत. पण नुकतेच ऐश्वर्या आणि अभिषेक लेकीला पाठींबा द्यायला एकत्र पोहोचले होते. या दोघांव्यतीरिक्त या कार्यक्रमात ऐश्वर्याची आई वृंदा राय, अभिषेक बच्चन आणि अगस्त्य नंदा देखील उपस्थित होता. पण याचवेळी जया बच्चन, श्वेता बच्चन आणि नव्या नवेली नंदा या कार्यक्रमातून गायब होत्या. याविषयी Reddit वर एक पोस्ट व्हायरल होत आहे.
advertisement
रश्मिका, तृप्तीचं नाही तर रणबीरनं चक्क बॉबी देओललाही केलं किस; आता OTT वर दिसणार दोघांचा तो सीन?
या पोस्टवर नेटिझन्स अनेक प्रतिक्रिया देत आहेत. याविषयी बोलताना चाहत्यांनी, 'प्रत्येक कुटुंबात सासू-सासरे नवरा बायकोतील दुराव्याचं कारण बनतात.' असं म्हटलं आहे. तसेच एकानं, 'अगस्त्यच्या चित्रपटाच्या प्रीमियरला ऐश्वर्या गेली होती मग आराध्याच्या कार्यक्रमात श्वेता बच्चन का दिसली नाही असा सवालही उपस्थित केला आहे.
धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक समारंभात त्यांची नात आराध्या बच्चन हिची कामगिरी पाहून अमिताभ बच्चन यांना आपल्या नातीचा अभिमान वाटला आहे. आराध्या साठी एक पोस्ट शेअर करत त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. बिग बींनी या ट्विटमध्ये लिहिले की, 'T 4860 - नातीच्या कामगिरीवर गर्व आणि आनंदी आहे.' बिग बींची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. तर दुसरीकडे ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चानी जोर धरला आहे. ऐश्वर्याने लेकीसोबत 'जलसा' हा बंगला सोडून ती तिच्या आईच्या घरी राहायला गेल्याचं बोललं जातंय. पण या जोडप्याने या अफवांवर अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण या दोघांच्यात नक्की काय बिनसलं आहे हे जाणून घेण्याची ओढ चाहत्यांना असून त्यांच्यात सगळं आलबेल असावं अशी प्रार्थनाही ते करत आहेत.