काजोल म्हणाली, "मला हा पुरस्कार माझ्या वाढदिवसा दिवशी मिळतो, मी खूप आनंदी आहे. हा माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे. मी खूप आनंदी आहे की आज माझी आईही माझ्याबरोबर आहे. तिलाही आधी हा पुरस्कार मिळाला होता, त्यामुळे माझ्यासाठी हा खूप मोठा दिवस होता."
advertisement
यानंतर काजोलला हिंदीतून बोलण्याची विनंती केली. तेव्हा काजोलने स्पष्ट नकार दिला. काजोल म्हणाली, "अभी मैं हिंदी में बोलू? जिसको समझना है वो समझ लेंगे"
काजोलला पुढे विचारण्यात आलं की, मराठीत काम करणार का? त्यावर काजोल म्हणाली, "नक्कीच मी मराठी सिनेमात काम करेन. मला अशी स्क्रिप्ट मिळाली तर मी नक्कीच करेन. पुढे काजोलनं हिंदीतही सांगितलं. ती म्हणाली, और हिंदी में कहू तो जरूर करूंगी."
पुरस्कार स्वीकारल्यानंतर काजोल भावुक झाली. ती म्हणाली, "नमस्कार सगळ्यांना, आज माझा वाढदिवस आहे आणि मी इथे या मंचावर उभी आहे इतक्या मोठ्या लोकांसमोर... अनुपमजी माझ्या वतीने खूप छान बोलले आहेत. यानंतर मी काय बोलू?'
यानंतर काजोल हिंदीत बोलत म्हणाली, "आज एवढं नक्की सांगेन की माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे. माझ्यासोबत माझी आई इथे उपस्थित आहे. मी माझ्या आईची साडी नेसले आहे. माझ्या आधी तिला हा पुरस्कार मिळाला होता. जसं मी म्हटलं माझ्या वाढदिवशी मिळालेला यापेक्षा मोठा पुरस्कार असूच शकत नाही की, आज मी मंचावर उभी आहे."
काजोलनं तिच्या सोशल मीडियावर पोस्ट देखील शेअर केली आहे. ज्यात तिने लिहिलंय, माझी आईचे पाय ज्या स्टेजला लागले त्याच स्टेजवर चालताना आणि ते ही माझ्या वाढदिवसाच्या दिवशी. युनिव्हर्स मला आठवण करून देत आहे की मी कुठून आले आहे आणि नेहमी कोणाला माझ्यासोबत घेऊन जात आहे.