'ही बाहुली माझ्यासाठी खूप प्रिय...' पुरस्कार स्वीकारताना महेश मांजरेकरांचे डोळे पाणावले, पत्नी मेधालाही अश्रू अनावर!
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Maharashtra State Marathi Film Awards : महेश मांजरेकर यांना महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात 'चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित असा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवी सोहळा नुकताच पार पडला. या दिमाखदार सोहळ्यात ६० आणि ६१ वे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना 'चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार स्वीकारताना महेश मांजरेकर खूप भावूक झाले, आणि त्यांच्या पत्नी मेधा मांजरेकर यांनाही आपले अश्रू आवरता आले नाहीत.
"मराठी सिनेमा योग्य हातात आहे!"
पुरस्कार स्वीकारताना महेश मांजरेकर यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. ते म्हणाले, "ही बाहुली माझ्यासाठी खूप प्रिय आहे. मला याचा खूप अभिमान आहे. व्ही. शांताराम यांनी मराठी सिनेमा वाढवला आणि त्याला मान दिला. वडाळ्याला बसचे पैसे वाचवायचे म्हणून मी चालत जायचो. प्लाझाच्या समोर एक ट्रँगल आहे. त्या ठिकाणी मी शांताराम बापूंना प्लाझाकडे बघताना पाहिलं होतं. तिथून आजपर्यंतचा माझा प्रवास पाहता, मी नक्कीच काहीतरी चांगलं काम केलं असेल."
advertisement
आपल्या भाषणात त्यांनी मराठी सिनेसृष्टीच्या भविष्याबद्दलही आशा व्यक्त केली. ते म्हणाले, "एका गोष्टीचा आनंद आहे, तो म्हणजे मराठी चित्रपटसृष्टी आता योग्य हातात आहे. मराठी सिनेमा पुन्हा एकदा दैदिप्यमान पदावर असेल, याची मी खात्री देतो."
अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना ‘चित्रपती कै. व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार २०२४’ मिळाल्यानंतर त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. #महाराष्ट्र_राज्य_मराठी_चित्रपट_पुरस्कार #Maharashtra #AshishShelar pic.twitter.com/lc4Q6S9FfY
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 5, 2025
advertisement
"आता स्पर्धेत उतरणं गरजेचं आहे!"
मांजरेकरांनी मराठी सिनेमांच्या सध्याच्या स्थितीवरही आपलं मत मांडलं. ते म्हणाले, "मी हल्ली काही चित्रपट पाहिले, त्यामुळे आता स्पर्धेत उतरणं गरजेचं आहे. कंटेंटच्या बाबतीत आपण पुढे आहोतच, पण आता व्यवहाराच्या बाबतीतही पुढे जाणं आवश्यक आहे."
या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांसारखे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या प्रतिष्ठित पुरस्कारामुळे महेश मांजरेकर यांच्या योगदानाला एक मोठी दाद मिळाली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 05, 2025 10:28 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'ही बाहुली माझ्यासाठी खूप प्रिय...' पुरस्कार स्वीकारताना महेश मांजरेकरांचे डोळे पाणावले, पत्नी मेधालाही अश्रू अनावर!