आई तनुजासोबत स्टेजवर भावनिक क्षण
या सोहळ्याची खास गोष्ट म्हणजे काजोलने तिच्या आई तनुजा यांच्यासोबत स्टेजवर हजेरी लावली. विशेष म्हणजे काजोलने आपल्या आईची एक जुनी साडी नेसली होती. हा हृदयस्पर्शी क्षण पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट झाला.
( अभी मैं हिंदी मे बोलू? काजोल चिडली, राज्य पुरस्कार सोहळ्यात नेमकं काय घडलं? VIDEO )
advertisement
मराठीत भाषण देताच टाळ्यांचा कडकडाट
काजोलनं रंगमंचावर मराठी भाषण केलं. तिचं मराठी ऐकून उपस्थित सगळ्यांनी आनंद व्यक्त केला. काजोलचं अस्खलित मराठी ऐकून प्रेक्षकांच्या टाळ्या थांबल्या नाहीत. काजोलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा सन्मान मिळाला. हा क्षण तिच्यासाठी अत्यंत मौल्यवान होता. काजोलने सांगितलं की, तिच्या आईलाही पूर्वी असाच सन्मान मिळाला होता, त्यामुळे हा पुरस्कार तिच्यासाठी खास ठरला.
भाषणाच्या शेवटी काजोलने हसत म्हटलं, "मला हा पुरस्कार माझ्या वाढदिवसा दिवशी मिळतो, मी खूप आनंदी आहे. हा माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे. मी खूप आनंदी आहे की आज माझी आईही माझ्याबरोबर आहे. तिलाही आधी हा पुरस्कार मिळाला होता, त्यामुळे माझ्यासाठी हा खूप मोठा दिवस होता."
काजोलची खास पोस्ट
काजोलने तिच्या सोशल मीडियावर सोहळ्याचे काही खास क्षण शेअर केलेत. पोस्टमध्ये काजोलनं लिहिलंय, "माझ्या आईने एकेकाळी ज्यावर पाऊल टाकलं होतं त्याच मंचावर आज मी चालत गेले आणि तेही माझ्या वाढदिवसाच्या दिवशी. असं वाटतंय जणू युनिव्हर्स मला सतत आठवतं करून देतंय की मी कुठून आले आहे आणि माझ्यासोबत नेहमी कोण आहे." अभिनेत्री तनुजा यांना 2014 साली राज्य शासनाने राज कपूर विशेष योगदान पुरस्कार देऊन सन्मानीत केलं होतं. त्यानंतर 10 वर्षांनी त्यांची मुलगी अभिनेत्री काजोलला हा पुरस्कार देण्यात आला. काजोलला मिळालेल्या सन्मानासाठी सर्वत्र तिचं कौतुक होत आहे.