'जिसको समझना है वो समझ लेंगे', हिंदीत बोलायला सांगताच काजोल चिडली; राज्य पुरस्कार सोहळ्यात नेमकं काय घडलं? VIDEO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Kajol Video : राज्य शासनाकडून राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पुरस्कार सोहळ्यानंतर बोलतानाचा काजोलचा एक व्हायरल होतोय.
मुंबई : बॉलिवूडची दिलखुलास अभिनेत्री काजोलसाठी 5 ऑगस्टचा दिवस अत्यंत खास ठरला. काजोलला तिच्या बर्थडे दिवशी तिच्या चित्रपट क्षेत्रातील विशेष योगदानासाठी राज्य शासनाकडून राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. काजोल तिची आई अभिनेत्री तनुजाबरोबर हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेली होती. पुरस्कार स्वीकारल्यानंतर काजोलनं मराठीतून प्रेक्षकांशी संवाद साधला. सगळ्यांचे आभार मानले. पण जेव्हा हिंदीत बोल असं सांगितलं तेव्हा काजोलनं तिच्या स्टाइलनं उत्तर दिलं. काजोलचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
काजोल म्हणाली, "मला हा पुरस्कार माझ्या वाढदिवसा दिवशी मिळतो, मी खूप आनंदी आहे. हा माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे. मी खूप आनंदी आहे की आज माझी आईही माझ्याबरोबर आहे. तिलाही आधी हा पुरस्कार मिळाला होता, त्यामुळे माझ्यासाठी हा खूप मोठा दिवस होता."
advertisement
यानंतर काजोलला हिंदीतून बोलण्याची विनंती केली. तेव्हा काजोलने स्पष्ट नकार दिला. काजोल म्हणाली, "अभी मैं हिंदी में बोलू? जिसको समझना है वो समझ लेंगे"
काजोलला पुढे विचारण्यात आलं की, मराठीत काम करणार का? त्यावर काजोल म्हणाली, "नक्कीच मी मराठी सिनेमात काम करेन. मला अशी स्क्रिप्ट मिळाली तर मी नक्कीच करेन. पुढे काजोलनं हिंदीतही सांगितलं. ती म्हणाली, और हिंदी में कहू तो जरूर करूंगी."
advertisement
advertisement
पुरस्कार स्वीकारल्यानंतर काजोल भावुक झाली. ती म्हणाली, "नमस्कार सगळ्यांना, आज माझा वाढदिवस आहे आणि मी इथे या मंचावर उभी आहे इतक्या मोठ्या लोकांसमोर... अनुपमजी माझ्या वतीने खूप छान बोलले आहेत. यानंतर मी काय बोलू?'
advertisement
यानंतर काजोल हिंदीत बोलत म्हणाली, "आज एवढं नक्की सांगेन की माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे. माझ्यासोबत माझी आई इथे उपस्थित आहे. मी माझ्या आईची साडी नेसले आहे. माझ्या आधी तिला हा पुरस्कार मिळाला होता. जसं मी म्हटलं माझ्या वाढदिवशी मिळालेला यापेक्षा मोठा पुरस्कार असूच शकत नाही की, आज मी मंचावर उभी आहे."
advertisement
काजोलनं तिच्या सोशल मीडियावर पोस्ट देखील शेअर केली आहे. ज्यात तिने लिहिलंय, माझी आईचे पाय ज्या स्टेजला लागले त्याच स्टेजवर चालताना आणि ते ही माझ्या वाढदिवसाच्या दिवशी. युनिव्हर्स मला आठवण करून देत आहे की मी कुठून आले आहे आणि नेहमी कोणाला माझ्यासोबत घेऊन जात आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 06, 2025 8:05 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'जिसको समझना है वो समझ लेंगे', हिंदीत बोलायला सांगताच काजोल चिडली; राज्य पुरस्कार सोहळ्यात नेमकं काय घडलं? VIDEO