32 वर्षीय एका टीव्ही अभिनेत्रीबाबत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अभिनेत्रीला तेव्हा काहीच कळलं नाही पण काही दिवसांनी संपूर्ण प्रकार तिच्या समोर आला आणि ती पूर्णपणे हादरून गेली. लेडिज टॉयलेटमध्ये तिचा गुपचूप व्हिडीओ शूट करण्यात आला. नंतर हा व्हिडीओ व्हायरल करू असं सांगून ब्लॅकमेल करण्यात आलं. अभिनेत्रीनं संपूर्ण प्रकरणाची पोलिसांत तक्रार दाखल केली. सायबर क्राईम पोलील या प्रकरणाचा तपास करत आहेत.
advertisement
( ब्रेकअप ब्रेकअप ब्रेकअप! बॉयफ्रेंड एकाच वेळी करत होता 5 मुलींचा डेट, शनाया कपूरने रंगेहाथ पकडलं )
या अभिनेत्री नाव समोर आलेलं नसतं तरी ती कन्नट टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ही घटना बेंगळुरू येथे घडल्याचे समोर आले आहे. अभिनेत्री एका इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित कार्यक्रमासाठी गेली होती. 6 ते 13 फेब्रुवारी 2026 दरम्यान हा प्रकार घडल्याचा उल्लेख एफआयआरमध्ये आहे. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार 7 फेब्रुवारी रोजी ती स्टेडियममधील लेडिज टॉयलेटचा वापर करत असताना एका अज्ञात व्यक्तीने तिचा अश्लील व्हिडीओ शूट केला आहे.
घटनेनंतर काही दिवसांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत असल्याची माहिती तिला मिळाली. आरोपीने तो व्हिडीओ Instagramवरील एका अकाउंटवरून दुसऱ्या अकाउंटवर पाठवला होता. ज्या अकाउंटवर व्हिडीओ पाठवण्यात आला ते अकाउंट अभिनेत्रीच्या मैत्रिणीचे होते. मात्र आरोपीला चुकीने ते अकाउंट पीडित अभिनेत्रीचेच आहे असे वाटले. यानंतर खऱ्या अर्थाने ब्लॅकमेलिंगला सुरुवात झाली. आरोपीने अभिनेत्रीशी संपर्क साधून तिचे आणखी खासगी व्हिडीओ असल्याचा दावा केला. हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करू अशी धमकी देत पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास तिची बदनामी केली जाईल अशीही धमकी दिली.
या संपूर्ण प्रकारानंतर अभिनेत्रीनं सायबर पोलिसांत धाव घेतली. घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. संबंधित इन्स्टाग्राम अकाउंटचा स्रोत शोधणे, व्हिडीओ नेमका कुठून शूट करण्यात आला, आरोपीची ओळख पटवण्याचं काम पोलीस करत आहेत.
