कतरिनाच्या जवळच्या सूत्रांनी बॉलिवूड हंगामाला दिलेल्या माहितीनुसार, कतरिना कैफ गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात आहे. पुढील महिन्यात 15 ते 30 ऑक्टोबरदरम्यान कतरिना आई होऊ शकते. कतरिनाला सध्या आपल्या प्रेग्नंसी सार्वजनिक करायची नाही, असं म्हटलं जात आहे. बाळाच्या जन्मानंतरच कतरिना किंवा विकीकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येईल.
Indias Top Comedian : खिशात 1200 रुपये, वडापाव खाऊन काढले दिवस; आज आहे TV चा सर्वात महागडा कॉमेडियन
advertisement
कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी 9 डिसेंबर 2021 रोजी राजस्थानमधील सिक्स सेंस फोर्टमध्ये राजेशाही थाटात लग्न केलं होतं. त्यावेळी सोशल मीडियावर लग्नसोहळ्याचे फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं होतं,"आमच्या हृदयात फक्त प्रेम आणि कृतज्ञता आहे. या नव्या प्रवासासाठी तुम्हा सर्वांच्या प्रेमाची आणि आर्शीवार्दाची अपेक्षा आहे".
मागील वर्षी चाहत्यांशी संवाद साधताना जेव्हा कतरिनाला विचारण्यात आलं की ती नेहमी इतकी शांत आणि संयमित कशी दिसते, तेव्हा तिने उत्तर दिलं होतं की,"जेव्हा मला कुठल्याही गोष्टीचं टेंशन येतं, तेव्हा मी घरी जाऊन 45 मिनिटं सतत बोलत राहते. विक्की मध्येच म्हणतो की, ही ओळ समजली नाही किंवा इंग्रजी थोडी वेगळी होती, पण तो पूर्ण लक्ष देऊन आणि प्रेमाने ऐकतो. यामुळे माझं मन हलकं होतं आणि मी रिलॅक्स होते.
कतरिना कैफ शेवटचं टायगर 3 (2023) आणि मेरी क्रिसमस (2024) या चित्रपटांमध्ये झळकली होती. तर विक्की कौशल नुकताच छावा या चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट 2025 मधील सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला.