Indias Top Comedian : खिशात 1200 रुपये, वडापाव खाऊन काढले दिवस; आज आहे TV चा सर्वात महागडा कॉमेडियन

Last Updated:

Indias Top Comedian : विनोदवीराचं आयुष्यही एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. मध्यमवर्गीय कुटुंबातून येणारा एक विनोदवीर संघर्षाचा सामना करुन आज कॉमेडीचा बादशाह बनला आहे.

News18
News18
Indias Top Comedian : एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला, अनेक संघर्षांना तोंड देत कॉमेडीचा बादशाह बनलेल्या विनोदवीराचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. गरिबीपासून श्रीमंतीपर्यंत पोहोचलेली त्याची ही कहाणी हेच दाखवते की पाहिलेलं स्वप्नं खरंच पूर्ण होऊ शकतं. आज तो देशातील टॉपचा यशस्वी विनोदवीर आहे. छोट्या पडद्यावरील एका लोकप्रिय विनोदी कार्यक्रमाचं तो होस्टिंग करतोय. घराघरांत तो ओळखला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या अप्रतिम विनोदबुद्धीने तो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आला आहे. आज फक्त मनोरंजनक्षेत्रात कार्यरत न राहता परदेशात त्याने स्वत:चं रेस्टॉरंट सुरू केलं आहे. पण आज यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या या विनोदवीराचा प्रवास एखाद्या नाट्यमय बॉलिवूड चित्रपटापेक्षा कमी नाही.
देशातील टॉपचा यशस्वी विनोदवीर अर्थात कपिल शर्माचा जन्म 2 एप्रिल 1981 मध्ये पंजाबमधील अमृतसरमध्ये झाला. त्याचे वडील जितेंद्र कुमार एक हेड कांस्टेबल होते. तर आई रानी एक गृहिणी. कपिल लहानपणापासूनच खूप मस्तीखोर आणि चुलबुला होता. टीव्ही पाहून कलाकारांच्या नकला करण्याची कपिलला आवड होती. लहानपणापासूनच आपल्या विनोदबुद्धिने तो लोकांचं मनोरंजन करत असे. त्यावेळी हा विनोदवीर उद्या संपूर्ण जगावर राज्य करेल असं कोणालाही वाटलं नव्हतं.
advertisement
कपिल शर्माने वयाच्या दहाव्या वर्षी एका पीसीओमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. वडिलांच्या निधनानंतर खूप लहान वयात कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कपिलला आपले स्वत:चे खर्च भागवण्यासाठी हे मनाविरुद्ध काम करावे लागले. कपिलचं संगणक आणि कमर्शियल आर्ट्सचंमध्ये शिक्षण झालं आहे.
advertisement
'असा' सुरू झाला कपिलच्या यशाचा प्रवास
कपिल शर्माला कॉलेजमध्ये असल्यापासून 'लाफ्टर चॅलेंज' या विनोदी रिअॅलिटी शोचा भाग व्हायचं होतं. अमृतसरमध्ये झालेल्या त्याच्या पहिल्या ऑडिशनमध्येच त्याला रिजेक्ट करण्यात आलं. त्यावेळी 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल'मध्ये नोकराची भूमिका करणारा त्याचा मित्र राजू मात्र निवडला गेला होता. पण चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तो पुन्हा एकदा दिल्लाला ऑडिशन द्यायला गेला. अखेर त्याची निवड झाली आणि 2007 मध्ये या कार्यक्रमाचा तो विजेतादेखील झाला.
advertisement
लाफ्टर चॅलेंज जिंकल्यानंतर कपिल शर्माच्या यशाच्या प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. अडचणी तर आल्या, पण कपिलने आपल्या आईसोबत मिळून प्रत्येक संकटाचा ठामपणे सामना केला. त्यांनी स्वतःचा कॉमेडी शो 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल' सुरू केला, जो टेलिव्हिजनवर प्रचंड यशस्वी ठरला आणि त्यांनी यशस्वी होस्ट व कॉमेडियनच्या यादीत आपलं नाव कायमचं कोरलं. कपिलने पुरस्कार समारंभांचं सूत्रसंचालन देखील सुरू केलं. कपिल आजच्या घडीला एक टॅलेंटचा खजिना आहे. होस्टिंग, अ‍ॅक्टिंगपासून ते सिंगिंगपर्यंत तो सर्व काही करतोय. त्याने सिंगिंग रिअ‍ॅलिटी शो स्टार या रॉकस्टार मध्येही भाग घेतला, जिथे त्याला दिग्गज गायिका लता मंगेशकर, सोनू निगम आणि सलीम-सुलेमान यांच्याकडून भरपूर प्रशंसा मिळालेली.
advertisement
1200 रुपये घेत गाठलेली मुंबई
कपिल शर्मा टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हणालेला,"वयाच्या 22 व्या वर्षी मी काही मित्रांसमवेत अमृतसरहून मुंबईला आलो होतो. त्यावेळी माझ्याकडे फक्त 1200 रुपये होते. वडा-पाव खाऊन मुंबईत दिवस काढल्यानंतर हातातले पैसे संपल्यावर कपिल पुन्हा अमृतसरला आपल्या घरी निघून गेला होता.
कपिलचं नेटवर्थ किती?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कपिल शर्माची एकूण संपत्ती 330 कोटी रुपयांच्या आसपास आहे. कपिलकडे सव्वा कोटी रुपयांची वॉल्वो एक्स सी 90 आणि 1 कोटी 20 लाख रुपयांची मर्सिडीज बेंड एस 350 सीडीआई आहे. 2013 मध्ये त्याने 60 लाखांची रेंज रोवर इवोक खरेदी केली होती. कपिलने 5.5 कोटी रुपयांची एक आलिशान व्हॅनिटी व्हॅन स्वत:साठी बनवून घेतली होती. वर्षाला तो 15 कोटी रुपयांचा इनकम टॅक्स भरतो. मुंबईत 15 कोटी रुपयांच्या घरात तो राहतोय.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Indias Top Comedian : खिशात 1200 रुपये, वडापाव खाऊन काढले दिवस; आज आहे TV चा सर्वात महागडा कॉमेडियन
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement