Sanjay Dutt : 'पायच मोडून टाकेन', संजय दत्तची लेकीला धमकी; बॉलिवूडमध्ये नो एन्ट्री, पण का?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Sanjay Dutt Daughter Trishala : संजय दत्त यांची मोठी लेक त्रिशाला दत्तला अभिनेत्री होण्याची इच्छा होती. पण तिला अभिनय क्षेत्रात येण्यावर संजू बाबाने बंदी घातली होती.
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यांनी आपल्या चित्रपटांनी आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. बॉलिवूडच्या सुपरस्टार्समध्ये संजू बाबाचाही समावेश आहे. आज अनेक सुपरस्टार्चची मुलं अभिनयक्षेत्रात आपलं नाणं खणखणीत वाजवत आहेत. संजय दत्त यांची मोठी लेक त्रिशाला दत्तलादेखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करायचं होतं.
advertisement
त्रिशाला दत्त सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. पण बॉलिवूडपासून मात्र ती अंतर ठेवूनच आहे. खरंतर त्रिशालाला अभिनेत्री व्हायचं होतं. पण अभिनयात करिअर करण्यापासून संयज दत्त यांनी तिला अडवलं. 2017 मध्ये माध्यमांशी बोलताना संजय दत्त यांनी त्यांची मोठी मुलगी त्रिशालाबद्दल भाष्य केलं होतं. त्यांनी ऑनस्क्रीन मुलगी अदिती राव हैदरी आणि रिअल लाईफमधील मुलगी त्रिशालासोबत तुलना करत असं म्हटलं होतं,"जर त्रिशालाने अभिनय क्षेत्र निवडलं असतं, तर मी तिचे पाय मोडून टाकले असते, पण अदितीसोबत मी असं करणार नाही".
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement