Women Centric Web Series : ओटीटीवर स्त्री शक्तीचा जागर! 'या' सीरिज नवरात्रीत पाहाच, पाचवी पाहून द्याल कडक सॅल्यूट

Last Updated:
Web Series Based on Women : जगाला महिलांची ताकद दाखवणाऱ्या अनेक स्त्रीकेंद्री वेब सीरिज ओटीटीवर प्रदर्शित झाल्या आहेत. अरण्यक, आर्या, महारानी अशा अनेक वेबसीरिजचा यात समावेश आहे.
1/7
 रवीना टंडन स्टारर 'अरण्यक' या वेबसीरिजमध्ये एका महिला पोलीस अधिकारीची कहानी दाखविण्यात आली आहे. नेटफ्लिक्सवरील ही सीरिज स्त्री सौंदर्यासह स्त्री शक्तीचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. तसेच आधुनिक भारतातील वुमन पॉवरचीही कहाणी दर्शवते. 'अरण्यक' या वेब सीरिजमुळे महिलांना आत्मविश्वास, शक्ती आणि इच्छाशक्तीचा अनुभव मिळेल.

advertisement
2/7
 पॉकेट एफएमवरील 'अगर तुम साथ हो' ही सीरिज प्रेमात आकंठ बुडालेली एक महिला आपलं प्रेम गमावते त्यानंतर कशाप्रकारे स्वत:ला सावरते आणि पुढे जाते हे या सीरिजमध्ये दाखवण्यात आलं आहे.

3/7
 हश हश ही प्राईम व्हिडीओवरील वेबसीरिज वुमेन पॉवरचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. खोटेपणा, धोका, फसवणूक आणि मेल ईगोचा सामना करताना या सीरिजमधील अनेक महिला पात्रं दिसतील. आपल्या कर्तृत्वाने त्या या सर्व गोष्टींचा सामना करतात.

4/7
 'चुडैल्स' ही झी 5 वरील एक रंजक वेब सीरिज आहे. नाव ऐकून ती हॉरर वाटू शकते, पण कथानक मात्र अगदी वेगळं आहे. ही अशा महिलांच्या गटाची कहाणी आहे ज्या गुपचुपपणे एक गुप्तहेर संस्था चालवतात. आपल्या पत्नीची फसवणूक करणारे पुरूष त्यांच्या निशाण्यावर असतात.

5/7
 सोनी लिव्हवरील 'महारानी' ही सीरिज पाहायला अजिबात विसरू नका. सीरिजमधील हुमा कुरैशी यांचा अभिनय जबरदस्त आहे. शेवटच्या एपिसोडपर्यंत ही सीरिज प्रेक्षकांना खिळवून ठेवते. कथानकातील ट्विस्ट आणि टर्न्स पाहताना प्रत्येकवेळी हुमा कुरैशी आपल्याला थक्क करते.

6/7
 डिझ्नी प्लस हॉटस्टारवर असलेली सुष्मिता सेनच्या अभिनयाने सजलेली आर्या ही वेब सीरिज आहे. एक आई आपल्या कुटुंबासाठी कशी रक्षक बनते, हीच 'आर्या'ची कथा आहे. या कथेत जबरदस्त सस्पेन्स आहे. सुष्मिता सेनचं प्रभावी पात्र प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतं. अत्यंत दमदार आणि रंजक अशी ही सीरिज आहे.

7/7
 अभिनेत्री शेफाली शाह आणि रसिका दुग्गल यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'दिल्ली क्राईम' या सीरीजमध्ये निर्भया प्रकरण दाखवण्यात आलं आहे. 2012 मध्ये निर्भया प्रकरण खूप चर्चेत होतं. ही सिरीज तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement