खूप दारू प्यायली म्हणून नेलं रुग्णालयात, महिलेचं लिव्हर पाहून डॉक्टरही धक्क्यात
- Published by:Priya Lad
Last Updated:
Drunken woman big liver : एका डॉक्टरांकडे या महिलेला आणण्यात आलं. ती खूप दारू प्यायली होती. तिला नीट चालताही येत नव्हतं. डॉक्टरांनी तिची तपासणी केली, तेव्हा तिच्या शरीरातील यकृत...
नवी दिल्ली : दारू पिणं आरोग्यासाठी वाईट, दारूचा लिव्हरवर परिणाम होतो. हे आपल्याला माहिती आहे. पण तरी एक महिला जी दारू प्यायली, पण तिचं यकृत पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला. ही महिला इतकी दारू प्यायली होती की तिला चालताही येत नव्हतं. म्हणून तिला रुग्णालयात आणण्यात आलं. पण तिचं यकृत पाहून डॉक्टर शॉक झाले.
रशियातील ही घटना आहे. व्लादिवोस्तोक शहरातील एका डॉक्टरांकडे या महिलेला आणण्यात आलं. ती खूप दारू प्यायली होती. तिला नीट चालताही येत नव्हतं. डॉक्टरांनी तिची तपासणी केली. तिच्या शरीरात एक खूप मोठं यकृत आढळलं. ज्याचा आकार मानवी हाताच्या आकारापेक्षा दुप्पट होता.
advertisement
सामान्यतः मानवी पोटातील यकृताचा आकार 13 ते 15 सेमी असतो, पण या महिलेच्या यकृताचा आकार मानवी हाताच्या आकारापेक्षा दुप्पट होता. या प्रकरणात विशेष गोष्ट अशी होती की हे यकृत एक सुपरन्यूमररी यकृत होतं. म्हणजे मूळ यकृत आधीच अस्तित्वात होतं आणि योग्यरित्या कार्य करत होतं. पण त्याशिवाय महिलेच्या शरीरात एक खूप मोठं यकृतदेखील आढळलं. डॉक्टरांनी त्याला उत्परिवर्ती यकृत म्हटलं होतं.
advertisement
महिलेला गंभीर अवस्थेत आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिने इतकं मद्यपान केलं होतं की तिला चालणंही कठीण झालं होतं. डॉक्टरांचं म्हणणं आहे की जास्त मद्यपान केल्याने यकृतामध्ये उत्परिवर्तन होतं, ज्यामुळे यकृताशी संबंधित विविध समस्या उद्भवू शकतात. महिलेला अॅडव्हान्स्ड अल्कोहोलिक पॉलीन्यूरोपॅथी असल्याचं निदान झालं. हा आजार मज्जासंस्थेवर परिणाम करतो आणि तो प्राणघातक ठरू शकतो. महिलेचं यकृत मोठं होतं, ज्यामुळे तिचे मूत्रपिंड निकामी होत होतं. सर्व प्रयत्न करूनही डॉक्टर महिलेला वाचवू शकले नाहीत.
advertisement
मानवी शरीर हे अविश्वसनीयपणे गुंतागुंतीचे आहे आणि असंख्य प्रक्रियांनी गुंतलेलं आहे. डॉक्टरांनी शारीरिक उपचारांपासून ते प्रत्यारोपणापर्यंतच्या उपचारांचा शोध लावला आहे हे खरं आहे, पण ते अजूनही शरीराच्या अवयवांना पूर्णपणे समजून घेतल्याचा आणि नियंत्रित केल्याचा दावा करू शकत नाहीत. वैद्यकीय जगात असंख्य प्रकरणे हे सिद्ध करतात. रशियातील प्रकरण त्यापैकीच एक. या यकृताबद्दलची माहिती टेलिग्रामवर शेअर करण्यात आली होती. बाजा बाजोन या टेलिग्राम अकाउंटने यकृताचा फोटो शेअर केला होता.
Location :
Delhi
First Published :
September 22, 2025 12:42 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
खूप दारू प्यायली म्हणून नेलं रुग्णालयात, महिलेचं लिव्हर पाहून डॉक्टरही धक्क्यात