काचा फुटल्या, बोनेटचा चक्काचूर; मुलुंड टोलनाक्यावर एकामेकांना धडकल्या 5 गाड्या, घटनास्थळावरचे PHOTO

Last Updated:
मुलुंडच्या टोलनाक्याजवळ विचित्र अपघात झाला. एका मागोमाग एक गाड्या धडकल्याने गाड्यांचे प्रचंड नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
1/5
मुंबईत आज सकाळपासून रिमझिम पाऊस पडत होता. पावसामुळे दृश्यमानता कमी असल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. असे असताना मुलुंडच्या टोलनाक्याजवळ विचित्र अपघात झाला.

advertisement
2/5
⁠चार ते पाच गाड्या एकमेकांना धडकल्या. ⁠एका मागोमाग एक गाड्या धडकल्याने गाड्यांचे प्रचंड नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. गाड्यांची दर्शनी भाग आणि मागील भागाचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आलेल्या चित्रफितीत दिसत आहे.

3/5
एका एसयूव्ही कारचा दर्शनी भाग पूर्णत: चेंबलेला होता. पुढील कारने अचानक ब्रेक मारल्याने मागील गाडी जाऊन धडकली. अशा विचित्र अपघातात जवळपास पाच गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

4/5
अपघातानंतर अनेक गाड्या एकाच ठिकाणी थांबल्याने जवळपास अर्धा तास मुलूंडच्या टोलनाक्याजवळ प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. अपघातग्रस्त वाहनांना बाजूला करून पोलिसांनी काही वेळात वाहतूक कोंडी फोडली.

5/5
या अपघातात काहींना किरकोळ जखमा आहेत. परंतु ⁠सुदैवाने कोणीही गंभीर जखमी नाही.

OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement