Pakistan Airstrike : पाकिस्तानच्या वायुसेनेने स्वत:च्याच देशात केला एअर स्ट्राईक, 30 नागरिकांचा मृत्यू!

Last Updated:

Pakistan Air Force strike : खैबर पख्तूनख्वा प्रांतात झालेल्या एअर स्ट्राईक या घटनेवर अजूनही पाकिस्तान सरकारने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. हवाई दलाने हा हल्ला कोणत्या कारणाने केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Pakistan Air Force strike
Pakistan Air Force strike
Pakistan Khyber Pakhtunkhwa : पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात पाकिस्तानी हवाई दलाने (Pakistan Air Force) केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये महिला आणि मुलांसह किमान 30 नागरिक ठार झाले आहेत. हा हल्ला सोमवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास झाला, जेव्हा पाकिस्तानी लढाऊ विमानांनी तिराह घाटीतील मत्रे दारा गावात आठ विनाशकारी बॉम्ब टाकले. त्यामुळे गाव आणि आसपासच्या परिसरात मोठी हानी झाल्याची माहिती मिळाली आहे.
JF-17 लढाऊ विमानांनी LS-6 श्रेणीतील बॉम्ब वापरून केले. हे बॉम्ब अत्यंत विनाशकारी मानले जातात. हल्ला झाला तेव्हा गावातील लोक झोपलेले होते. जोरदार स्फोटांच्या आवाजाने त्यांची झोप उडाली आणि पाहता पाहता गावाचा मोठा भाग उद्ध्वस्त झाला. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात 30 नागरिकांचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
advertisement
advertisement
खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान हे दोन पाकिस्तानी प्रांत आहेत ज्यांनी देशाच्या सरकार आणि लष्कराविरुद्ध दीर्घकाळापासून संताप व्यक्त केला जातोय. या प्रांतांमधील अनेक सशस्त्र गटांविरुद्ध पाकिस्तानने स्वत:च्याच देशात एअर स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
दरम्यान, या घटनेवर अजूनही पाकिस्तान सरकारने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. हवाई दलाने हा हल्ला कोणत्या कारणाने केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, या हल्ल्यामध्ये ठार झालेले आणि जखमी झालेले सर्वजण सामान्य नागरिक आहेत. या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे.
मराठी बातम्या/देश/
Pakistan Airstrike : पाकिस्तानच्या वायुसेनेने स्वत:च्याच देशात केला एअर स्ट्राईक, 30 नागरिकांचा मृत्यू!
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement