भारतीय रेल्वेमध्ये 30307 पदांची मेगाभरती! ग्रॅजुएट उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी; मिळणार 35,400 रूपये पगार

Last Updated:

RRB NTPC Online Application 2025 : रेल्वे विभागात तुमच्याकडे नोकरी करण्याची फार मोठी संधी आहे. रेल्वेत मेगा भरती सुरू आहे. रेल्वेत तब्बल 30 हजारापेक्षा जास्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

News18
News18
अनेकांचे रेल्वे विभागात नोकरी करण्याचे स्वप्न असते. आता रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे तुमचेही स्वप्न पूर्ण होऊ शकते. रेल्वे विभागात तुमच्याकडे नोकरी करण्याची फार मोठी संधी आहे. रेल्वेत मेगा भरती सुरू आहे. रेल्वेत तब्बल 30 हजारापेक्षा जास्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचनादेखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. नोकरीच्या शोधात असणार्‍यांनी अजिबातच वेळ वाया न घालवता, भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावेत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करावा लागणार आहे. चला तर मग लगेचच करा या भरती प्रक्रियेसाठी अर्ज.
रेल्वे भरती बोर्डाने “मुख्य व्यावसायिक आणि तिकीट पर्यवेक्षक, स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, कनिष्ठ लेखा सहाय्यक आणि टंकलेखक, वरिष्ठ लिपिक आणि टंकलेखक” पदांच्या एकूण 30307 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणार्‍या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सुरूवात 30 ऑगस्टपासून झाली आहे. तर, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ सप्टेंबर २०२५ आहे. त्यामुळे आता अर्जदारांकडे ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. फार कमी दिवस शिल्लक राहिल्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करावा.
advertisement
उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे जाहिरातीमध्ये दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवून द्यायचे आहे. अर्ज पाठवताना अर्जदारांनी जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेले आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावे. अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराने अधिक माहिती करिता शेअर करण्यात आलेली PDF जाहिरात बघावी. तिकीट सुपरवायझरसाठी 6235 पदे, स्टेशन मास्तरसाठी 5623 पदे, मालवाहू गाडी मॅनेजरसाठी 3562 पदे, जूनियर अकाउंट असिस्टंट टायपिस्टसाठी 7520 पदे, सीनियर क्लर्क टायपिस्टसाठी 7367 पदे अशी भरती केली जाणार आहे.
advertisement
मुख्य व्यावसायिक- तिकीट पर्यवेक्षक आणि स्टेशन मास्टर पदासाठी 35, 400 रूपये इतका पगार असणार आहे. पात्र उमेदवाराला 6 व्या वेतनाप्रमाणे पगार मिळणार आहे. गुड्स ट्रेन मॅनेजर, कनिष्ठ लेखा सहाय्यक आणि टंकलेखक, वरिष्ठ लिपिक आणि टंकलेखक पदासाठी 29, 200 इतका पगार असणार आहे. पात्र उमेदवाराला 5 व्या वेतनाप्रमाणे पगार मिळणार आहे. अर्जदाराचे वय 18 ते 35 दरम्यान आवश्यक आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भारतीय रेल्वेमध्ये 30307 पदांची मेगाभरती! ग्रॅजुएट उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी; मिळणार 35,400 रूपये पगार
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement