Thane Metro Trial: ठाणेकरांची स्वप्नपूर्ती एक पाऊल दूर! मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेट्रोची ट्रायल सुरू

Last Updated:

Thane Metro Trial: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाणे मेट्रोच्या ट्रायलचा शुभारंभ झाला.

Thane Metro Trial: ठाणेकरांची स्वप्नपूर्ती एक पाऊल दूर! मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेट्रोची ट्रायल सुरू
Thane Metro Trial: ठाणेकरांची स्वप्नपूर्ती एक पाऊल दूर! मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेट्रोची ट्रायल सुरू
ठाणे: बहुप्रतिक्षित मेट्रो लवकरच ठाणे शहरात धावणार आहे. वडाळा ते कासारवडवली मेट्रो 4 आणि कासारवडवली ते गायमुख 4 अ या दोन लेनच्या ट्रायल सुरू झाल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज ट्रायलचा शुभारंभ झाला. गायमुख ते विजय गार्डन या टप्प्यावर मेट्रोचा ट्रायल रन घेण्यात आला. फडणवीस आणि शिंदे यांच्यासह उपस्थित नेत्यांनी मेट्रोने प्रत्यक्ष प्रवास केला.
पुढील काही दिवस सुरू राहणाऱ्या ट्रायल रनमध्ये एकूण 10 स्टेशन्सचा समावेश आहे. कॅडबरी, माजीवाडा, कपूरबावडी, मानपाडा, टिकुजीनी वाडी, डोंगरी पाडा, विजय गार्डन, कासरवडवली आणि गायमुख या स्टेशनदरम्यान मेट्रोची ट्रायल घेतली जाणार आहे. ठाण्यातील मेट्रो मार्गिका सुरू झाल्यानंतर ठाणेकरांना मुंबई, नवी मुंबई, वडाळा, भांडुप आणि घोडबंदरकडे जाताना मोठा फायदा होणार आहे. प्रवास अधिक सोयीस्कर आणि वेगवान होईल.
advertisement
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेट्रो 4 आणि मेट्रो 4 अ हा एकत्रित सुमारे 35 किलोमीटर लांबीचा मार्ग आहे. यावर एकूण 32 मेट्रो स्टेशन्स उभारली जाणार आहेत. या प्रकल्पासाठी 16 हजार कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे. या दोन्ही मेट्रो लेनवर दररोज 13 लाख 43 हजार प्रवासी प्रवास करतील, अशी अपेक्षा आहे.
advertisement
मेट्रोच्या डेपोसाठी मोघरपाडा येथे हेक्टर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याठिकाणी मेट्रो 4, मेट्रो 4 अ, मेट्रो 10 आणि मेट्रो 11 चा डेपो असेल. पूर्व उपनगरे, पश्चिम उपनगरे, मुंबई शहर आणि ठाणे शहर या सगळ्यांना जोडणारा हा मार्ग असेल आहे. एकत्रित विचार केल्यास हा देशातला सर्वात लांब मार्ग होईल. या मेट्रोमार्गामुळे प्रवासाचा वेळ 50 ते 75 टक्के कमी होणार आहे. एलिव्हेटेड मार्ग असल्याने रस्त्यावरील वाहतूक देखील कमी होईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
advertisement
कशी असेल ठाणे मेट्रो?
ठाणे मेट्रोत बीईएमएलचे (BEML) 6 डब्यांचे ट्रेन सेट्स असतील. सध्या मेट्रो 2 अ आणि 7 वर अशाच पद्धतीची मेट्रो धावत आहे. गाडीत आधुनिक ट्रेन कंट्रोल अँड मॅनेजमेंट सिस्टीम, प्रवासी आपत्कालीन संपर्क यंत्रणा, ऑटोमॅटिक अग्निशमन प्रणाली, अडथळा शोध उपकरण, आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी दरवाजा, ऑन-बोर्ड सार्वजनिक उद्घोषणा व माहिती प्रणाली, ऊर्जा बचत करणारी पुनरुत्पादक ब्रेकिंग प्रणाली इत्यादी अत्याधुनिक सुविधा असतील.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Thane Metro Trial: ठाणेकरांची स्वप्नपूर्ती एक पाऊल दूर! मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेट्रोची ट्रायल सुरू
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement