TRENDING:

'तो अचानक बदलायचा, प्राण्यांसारखा वागायचा...' प्रसिद्ध गायकाच्या चौथ्या बायकोचा शॉकिंग खुलासा

Last Updated:

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे त्यांच्या कामासोबत त्यांच्या पर्सनल लाइफमुळे जास्त चर्चेत राहिले. असाच एक गायक ज्याचं वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे त्यांच्या कामासोबत त्यांच्या पर्सनल लाइफमुळे जास्त चर्चेत राहिले. असाच एक गायक ज्याचं वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलं. या गायकाच्या चौथ्या बायकोने अनेक थक्क करणाऱ्या गोष्टी सांगितल्या.
 प्रसिद्ध गायकाच्या चौथ्या बायकोचा शॉकिंग खुलासा
प्रसिद्ध गायकाच्या चौथ्या बायकोचा शॉकिंग खुलासा
advertisement

आपण बोलत असलेले हे गायक आहेत किशोर कुमार. किशोर कुमार हे फक्त गायक नव्हते ते एक विनोदी अभिनेता, संगीतकार, दिग्दर्शक आणि हटके व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा स्वभाव अनिश्चित, कधी गंभीर तर कधी बालिश; पण त्यांच्या आवाजात जादू होती जी आजही जिवंत आहे.

'मी सगळ्यांची जाहीर माफी मागतो'; बिग बींनी थेट हातच जोडले, झालं काय?

advertisement

त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचं रहस्यही तेवढंच रंगतदार आणि गुंतागुंतीचं होतं. चार लग्नं केलेल्या या महान गायकाच्या शेवटच्या पत्नी लीना चंदावरकर यांनी एकदा एका मुलाखतीत काही आश्चर्यचकित करणारे खुलासे केले होते.

लीना म्हणाल्या होत्या, “किशोरचा मूड नेहमी बदलत असे. तो कधी मुलासारखा निरागस, तर कधी शांत आणि गहन व्हायचा. पण एक गोष्ट कायम होती त्याला ‘वेडा’ म्हणणं अजिबात आवडत नसे.” त्यांनी पुढे सांगितलं की एकदा ‘मैं प्यार का अजनबी हूँ’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एक घटना घडली जी त्या कधीच विसरू शकल्या नाहीत. “मी मेकअप रूममध्ये होते. किशोरने मला विचारलं ‘माझ्याबद्दल काही अफवा ऐकल्या आहेत का?’ मी नाही म्हणाले, कारण मला वाद नको होता. पण पुढच्या क्षणी त्याने असा चेहरा केला जणू तो प्राणी झाला आहे. मी अक्षरशः घाबरले. मग मी पटकन होकार दिला. तो लगेच शांत झाला आणि म्हणाला ‘हे आधी का नाही सांगितलंस?’”

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकरांनो सावधान! तुमच्या फोटोचा कुणी गैरवापर तर करत नाही ना? नवा Scam समोर
सर्व पहा

लीना म्हणाल्या, किशोरच्या स्वभावाने त्या घाबरलेल्या असायच्या, पण त्याचवेळी ती त्याला समजून घेण्याचा प्रयत्नही करायची. “तो आतून खूप संवेदनशील होता. लोकांनी त्याला विचित्र म्हटलं, पण तो फक्त वेगळा होता. किशोर कुमारचा स्वभाव अनेकांना गोंधळवून टाकायचा. तो स्वतःचं जग वेगळ्या पद्धतीने जगायचा भान हरपून गाणी रेकॉर्ड करायचा, शूटिंगदरम्यान अचानक हसून सगळ्यांना थक्क करायचा, आणि एकांत आवडायचा."

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
'तो अचानक बदलायचा, प्राण्यांसारखा वागायचा...' प्रसिद्ध गायकाच्या चौथ्या बायकोचा शॉकिंग खुलासा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल