अलीकडेच सिंघम अभिनेता अजय देवगण आणि चित्रपट निर्माता रोहित शेट्टी करण जोहरच्या शोमध्ये पाहुणे म्हणून आले होते. शोमध्ये करण, अजय आणि रोहितने एकत्र खूप मजा केली. नेहमीप्रमाणे करणने शोमधील पाहुण्यांना मसालेदार प्रश्न विचारले. या शोमध्ये करणने अजयला असा प्रश्न विचारला की सिंघम अभिनेताही थोडा गोंधळला.
इतकी सुंदर दिसते दाऊद इब्राहिमची लेक; सौंदर्यात बड्या अभिनेत्रींनाही देते मात; फोटो पाहून व्हाल चकित
advertisement
करण जोहरच्या शोमध्ये अजय आणि रोहित यांनी खूप मजा केली. करण जोहरच्या या शोचा रॅपिड-फायर राउंड खूप गाजतो. याच दरम्यान मध्ये करणने अजयला विचारले की, शाहरुख आणि सलमानपैकी कोणावर विश्वास ठेवता येईल, या प्रश्नाचे अजयने अतिशय हुशारीने उत्तर दिले. तो म्हणाला की, दोघांच्या बँक बॅलन्सनुसार मला वाटते की शाहरुख खानकडे जास्त पैसे आहेत.
अजय देवगणचे उत्तर ऐकून करण जोहरनेही त्याच्या बोलण्याला होकार दिला. 'होय, विशेषत: यावर्षी' म्हणाला. शाहरुख खानसाठी हे वर्ष खूप खास ठरले आहे. यावर्षी त्यांचे तीन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.
प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ होती आणि चित्रपटगृहात हा चित्रपट पोहोचताच पहिल्याच दिवशी तो पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षकही आले होते. 'डिंकी'ने पहिल्याच दिवशी 30 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचा आकडा शाहरुख खानच्या मागील पठाण आणि जवान या चित्रपटांपेक्षा कमी आहे. त्यामुळेच शाहरुख खानचा पठाण आणि जवान नंतर आता डंकी मधून हायट्रीक करणार का याकडेच सगळ्यांचं लक्ष आहे. डंकी सिनेमात शाहरूख खानबरोबर अभिनेत्री तापसी पन्नू, विक्की कौशल, बोमन ईरानी, सतीश शाह आणि विक्रम कोचर हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.