इतकी सुंदर दिसते दाऊद इब्राहिमची लेक; सौंदर्यात बड्या अभिनेत्रींनाही देते मात; फोटो पाहून व्हाल चकित

Last Updated:

सध्या दाऊदविषयी चर्चा होत आहे. आज त्याच्या परिवाराविषयी एक रंजक माहिती जाणून घेऊया. त्याच्या मुलीचा फोटो पाहून तुम्ही थक्क व्हाल.

दाऊद इब्राहिमची मुलगी
दाऊद इब्राहिमची मुलगी
मुंबई, 22  डिसेंबर : 1993 च्या बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड असलेल्या दाऊद इब्राहिम भारताचा मोस्ट वॉन्टेड डॉन आहे. भारताच्या सुरक्षा व्यवस्था अनेक वर्षांपासून त्याचा शोध घेत आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद पाकिस्तानात लपून बसल्याचे मानले जात आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय डॉनला मदत करत असल्याचेही बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वीच दाऊद विषयी एक मोठी बातमी समोर आली होती. त्यानंतर सध्या दाऊदविषयी चर्चा होत आहे. आज त्याच्या परिवाराविषयी एक रंजक माहिती जाणून घेऊया. त्याच्या मुलीचा फोटो पाहून तुम्ही थक्क व्हाल.
एक काळ असा होता की दाऊदचा बॉलिवूडवर बराच प्रभाव होता. गुलशन कुमार यांच्या मृत्यूमागेही दाऊदचे नाव पुढे आले होते. या डॉनसोबत अनेक बॉलिवूड अभिनेत्रींचे अफेअर असल्याच्या बातम्याही समोर आल्या. अलीकडेच दाऊद इब्राहिमबद्दल बातमी आली होती की डॉनला कराचीमध्ये विषबाधा झाली आहे, त्यानंतर त्याच्यावर तेथे उपचार सुरू आहेत. मात्र, याला अधिकृतपणे कुठेही दुजोरा मिळालेला नाही.
advertisement
दीपिकाला ज्याच्यासोबत थाटायचा होता संसार, त्याच अभिनेत्यावर झालेत लैंगिक शोषणाचे धक्कादायक आरोप
आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडवर अधिराज्य गाजवणाऱ्या दाऊदची मोठी मुलगी माहरुखचे फोटो दाखवणार आहोत. तिच्या लग्नाचे फोटो समोर आल्यावर लोक थक्क झाले होते. दाऊद इब्राहिमच्या पत्नीचे नाव मेहजबीन उर्फ ​​जुबिना जरीना आहे. दाऊदच्या मुलाचे नाव मोईन इब्राहिम आहे तर मोठ्या मुलीचे नाव माहरुख आणि धाकटीचं नाव महरीन आहे. दाऊदच्या मुलीचं म्हणजेच माहरुखचं लग्न माजी पाकिस्तानी क्रिकेटर जावेद मियांदाद यांचा मुलगा जुनैद मियांदादसोबत झालं आहे.
advertisement
दाऊद इब्राहिमची मुलगी
दाऊद इब्राहिमची मुलगी
जुनैद आणि माहरुखचं लग्न 2006 मध्ये झालं होतं. यंदा दुबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये माहरुखचा वालीमा पार पडला होता. माहरुखच्या लग्नादरम्यान समोर आलेल्या फोटोंमध्ये ती वरपासून खालपर्यंत सोन्याच्या दागिन्यांनी माखलेली दिसत होती. तिचे सुंदर फोटो खूप व्हायरल झाले होते. रिपोर्ट्सनुसार, माहरुख आणि तिचा पती जुनैद खूप लक्झरी आयुष्य जगतात. दाऊदने आपल्या मालमत्तेतील मोठा हिस्सा त्याची मुलगी आणि जावयालाही दिला असल्याचंही बोललं जातं.
मराठी बातम्या/मनोरंजन/
इतकी सुंदर दिसते दाऊद इब्राहिमची लेक; सौंदर्यात बड्या अभिनेत्रींनाही देते मात; फोटो पाहून व्हाल चकित
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement