दीपिकाला ज्याच्यासोबत थाटायचा होता संसार, त्याच अभिनेत्यावर झालेत लैंगिक शोषणाचे धक्कादायक आरोप

Last Updated:

दीपिकाने ज्या अभिनेत्यासोबत मुलं होऊ देण्याची इच्छा व्यक्त केली होती. दीपिकाला यानंतर खूपच ट्रोल करण्यात आलं होतं. दीपिकाच्या याच को-स्टार विषयी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दीपिका पदुकोण-  विन डिझेल
दीपिका पदुकोण- विन डिझेल
मुंबई, 22 डिसेंबर :  दीपिका पदुकोणने 2017 मध्ये अभिनेता विन डिझेलसोबत XXX: Return of Xander Cage या चित्रपटातून हॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटातील दीपिकाच्या बोल्डनेस आणि लूकचे खूप कौतुक झाले. मात्र, या चित्रपटामुळे दीपिका काही वादातही सापडली होती. दीपिकाने या अभिनेत्यासोबत मुलं होऊ देण्याची इच्छा व्यक्त केली होती. दीपिकाला यानंतर खूपच ट्रोल करण्यात आलं होतं. दीपिकाच्या याच को-स्टार विषयी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
फास्ट अँड फ्युरियस फ्रेंचायझीचा मुख्य अभिनेता विन डिझेलवर त्याच्या माजी सहाय्यकाने लैंगिक छळाचा आरोप केला आहे. गुरुवारी, ग्लोबल स्टारची माजी सहाय्यक अस्टा जॉन्सन यांनी लॉस एंजेलिसमध्ये केस दाखल केली, ज्यामध्ये तिने अभिनेत्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. सहाय्यकाचा दावा आहे की अभिनेताने 2010 मध्ये अटलांटा येथे 'फास्ट फाइव्ह'चे शूटिंग करत असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. डिझेलने असिस्टंटला हॉटेलच्या खोलीत बोलावून दार बंद करून खोलीच्या भिंतीला दाबले. यानंतर तो तिच्यासमोर हस्तमैथुन करू लागला असे धक्कादायक आरोप त्याच्यावर करण्यात आले आहेत.
advertisement
अभिनेत्याच्या माजी असिस्टंटच्या तक्रारीनुसार, कंपनीने असिस्टंटला विन डिझेलचे सर्व काम पाहण्यास सांगितले होते. यामध्ये सामाजिक कार्यक्रमांमध्ये अभिनेत्यासाठी सर्व व्यवस्था करणे, त्याच्यासोबत राहणे आणि प्रवास करणे, कार्यक्रमांना उपस्थित राहणे आणि त्याचे काम व्यवस्थापित करणे याचा समावेश होता. पण, याचदरम्यान अभिनेत्याने तिच्यावर अनेक वेळा जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला असा आरोप तिने केला आहे.
advertisement
अभिनेत्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, सप्टेंबर 2010 मध्ये अभिनेत्याने त्याच्या सहाय्यकाला सेंट रेगिस हॉटेलमधील त्याच्या खोलीत येण्यास सांगितले आणि तो क्लबमधून परत येईपर्यंत थांबण्यास सांगितले. डिझेल क्लबमधून परत येताच त्याने पुन्हा सहाय्यकावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. अभिनेत्याने असिस्टंटला त्याच्या बेडवर ओढले आणि त्याचे कपडे काढायला सुरुवात केली. त्याने जोनासनला अशा प्रकारे पकडले होते की तिला पळून जाणे शक्य नव्हते.
advertisement
डिझेलने त्याचे कपडे काढायला सुरुवात करताच जोनासनने डोळे मिटले आणि डिझेलच्या भीतीने गप्प बसली. तिला फक्त स्वतःला अभिनेत्यापासून दूर ठेवायचे होते. नोकरीची जाण्याची भीती असूनही, जोनासनने कसं तरी विनला स्वतःपासून दूर ढकललं. पण, त्यानंतर अभिनेत्याने तिला पकडलं. जेव्हा डिझेलने त्याचे अंडरवेअर काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा जोनासनने हिंमत एकवटुन आरडाओरडा केला.
advertisement
दीपिकाने 2017 मध्ये XXX चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एक मुलाखत दिली होती. 'कॉफी विथ करण'मध्ये रणवीरसोबत दीपिका दिसली तेव्हा ही मुलाखत पुन्हा चर्चेत आली. ही मुलाखत Ellen DeGeneres Show ची आहे. दीपिका या शोमध्ये पाहुणी म्हणून आली होती आणि येथे होस्टने दीपिकाला तिचा आणि विनचा एक फोटो दाखवत तिला 'तुमच्यामध्ये काय चाललंय?' असा प्रश्न विचारला होता. याला उत्तर देताना दीपिका म्हणाली होती, 'आगीशिवाय धूर निघत नाही. पण हे सर्व माझ्या मनात आहे...माझ्या मनात असे आहे की विन आणि मी एकत्र आहोत...आम्ही एकत्र राहतो...आमच्यात छान नातं आहे आणि आम्हाला मुले आहेत...पण हे सर्व माझ्या मनात आहे.' असं धक्कादायक विधान दीपिकाने केलं होतं. विशेष म्हणजे ती तेव्हा रणवीर सिंगसोबत नात्यात होती, त्यांचा २०१५ मध्येच साखरपुडाही झाला होता. त्यानंतर दीपिकाने असं विधान केलं होतं. त्यामुळं तिला खूप ट्रोल करण्यात आलं होतं.
मराठी बातम्या/मनोरंजन/
दीपिकाला ज्याच्यासोबत थाटायचा होता संसार, त्याच अभिनेत्यावर झालेत लैंगिक शोषणाचे धक्कादायक आरोप
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement