अंकिता आणि कुणालसाठी तिच्या घरच्यांनी केळवणाचे आयोजन केले होते. यावेळी अंकिताने लाल रंगाची सिंपल कॉटन साडी नेसली होती. तर कुणालने पांढऱ्या रंगाचा शॉर्ट सदरा घातला होता. अंकिता-कुणालच्या केळवणासाठी तिच्या घरच्यांनी खास सजावट केली होती. यावेळी हे जोडपं अतिशय आनंदी दिसत होतं.
जेवण सुरू होण्याआधी घरच्यांनी या जोडप्याला उखाणं घेण्याचा आग्रह केला. त्यावर हे जोडपं पुरतं गोंधळलं. अंकिताने उखाण्याची कोणतीही तयारी केली नव्हती. पण तिने ताबडतोब जबरदस्त उखाणा घेतला. ती म्हणाली, "समोर आहे बासुंदी, खायची झालीय मला घाई, कुणालचं नाव घेते, सुरु झाली लगीनघाई." अद्याप अंकिताने तिच्या लग्नाची तारिख समोर आणली नाहीय.
advertisement
अंकिताचा होणारा नवरा कुणाल हा गायक, लेखक आणि संगीत दिग्दर्शक आहे. अनेक मराठी मालिकांसाठी त्याने काम केलं आहे. कुणाल हा देखील कोकणातील माणगाव येथील आहे. अंकिता आणि कुणाल यांनी ''आनंदवारी'' हे गाणं एकत्र केलं होतं. दोघे अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळख होते. दरम्यान, गेल्याच आठवड्यात अंकिताने आलिशान कार घेतली आहे. या कारची किंमत ७० लाख असल्याचे सांगण्यात येत आहे.