या प्रकरणावर आता अभिनेत्री कोंकणा सेन शर्माने आपले मत मांडले आहे. तिने दीपिकेला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. न्यूज 18 शी बोलताना कोंकणा म्हणाली, "फिल्म इंडस्ट्रीत एक ठराविक व्यवस्था असली पाहिजे. कलाकार हे माणूस आहेत, मशीन नाहीत. आपण डॉक्टर किंवा न्यूरोसर्जन नाही, ज्यांना आपत्कालीन परिस्थितीत सतत काम करावं लागतं. त्यामुळे मर्यादित कामाचे तास असणे अत्यावश्यक आहे."
advertisement
अभिषेकचा स्पेशल मोमेंट, आई, बहिण सगळेच उपस्थित पण पत्नी ऐश्वर्याच MISSING; पाहा VIDEO
कोंकणा पुढे म्हणाली, "जर एखाद्या निर्मात्याने प्रकल्पात पैसे गुंतवले असतील, तर ते आपले काम वेळेत पूर्ण होण्याची अपेक्षा ठेवतात, हे योग्य आहे. पण कलाकारांनाही ब्रेक, विश्रांती आणि वैयक्तिक वेळ गरजेचा असतो. 12 तासांची शिफ्ट अनेकदा 14-15 तासांपर्यंत वाढते, जे आरोग्यासाठीही चांगले नाही."
तिने पुढे म्हटलं, "इंडस्ट्रीने कलाकारांसाठी आठ तासांचे कामाचे नियम आणि आठवड्यातून एक सुट्टीचा दिवस निश्चित केला पाहिजे. यामुळे कामाची गुणवत्ता सुधारेल आणि कलाकार मानसिकदृष्ट्या अधिक स्थिर राहतील".