व्हिडीओमध्ये क्रांती म्हणते, आज आमची मम्मी शूट करतेय आमच्याबरोबर. तिचा मेकअप झालेला आहे. मम्मी तू काय सांगत होतीस आम्ही तुझा फोटो काढायचा आहे. क्रांतीची आई म्हणाली, "हो फोटो काढला आठवण राहिल ना. मी यंग असताना कशी दिसत होते हे तुम्हाला आठवेल. आता कसं मी म्हातारी झाले त्यामुळे सौंदर्य राहिलं नाही."
advertisement
( अप्सरा, चंद्रा, फुलवंतीनंतर आता येतेय 'फुला'! पहिली झलक,काय आहे स्टोरी? )
क्रांतीने विचारलं, "पण फोटो का काढायला सांगतेस." आई म्हणाली, "फोटो याच्यासाठी मी मेले गेले तर तुम्हाला लागला फोटो कशाला.. पूजा करायला, तेराव्याला वगैरे असलेला बरा." क्रांती म्हणाली, "कळलं काय करणार याचं. प्रेपरेशन बघितले तेराव्याचे. माझे फोटो काढा वगैरे. तर ही अशी माझी आई आहे."
अभिनेत्री क्रांतीचं तिच्या आईबरोबर खूप इमोशनल नातं आहे. तिच्या करिअरमध्ये तिच्या आई-वडिलांनी तिला खूप साथ दिली. आई आणि वडिलांच्या अनेक आठवणी क्रांती तिच्या व्हिडीओमध्ये शेअर करत असते. क्रांतीची आई खूप हजरजबाबी आणि स्पष्टवक्ती आहे. आईचं तिखट बोलणं, तिची काळजी घेणं, प्रेम करणं अशा अनेक गोष्टी तिची चाहत्यांबरोबर शेअर करत असते.
पण हा व्हिडीओ पाहून क्रांतीचे चाहते देखील इमोशनल झाले. एका चाहत्याने लिहिलंय, तुम्हाला उदंड आयुष्य लाभो! खूप आशीर्वाद, निरोगी राहा. खूप प्रेम, दुसऱ्यानं लिहिलं, आई असा नका बोलू प्लिज. तुम्हाला अजून खूप वर्ष जगायचं आहे.तुम्हाला आम्हाला खूप वर्ष पाहायचं आहे. आणखी एका चाहत्यानं लिहिलंय, डोळे भरून आलेले.. कळलं. शेवटी आई ती आईच.
