बॉलीवूडमध्ये 90 चं दशक म्हणजे नवी क्रांती. नवे नायक, वेगळ्या कथा आणि धाडसी संकल्पना मोठ्या प्रमाणावर येत होत्या. अशा काळात जुने पडून राहिलेले प्रोजेक्ट्स टिकवणे अवघड होतं. याच काळात 1995 साली प्रदर्शित झालेला "पापी देवता" हा चित्रपट एक मोठं उदाहरण ठरला.
'प्रचंड वेदना, खूप त्रास व्हायचा', सलमान खानला गंभीर आजार, अनेक वर्षांपासून देतोय झुंज
advertisement
या चित्रपटात माधुरी दीक्षित, जितेंद्र, धर्मेंद्र, अमरीश पुरी असे मोठे कलाकार होते. इतक्या स्टारकास्ट असूनही, चित्रपट थेट बॉक्स ऑफिसवर कोसळला. खरं तर या चित्रपटाचं शूटिंग 80 च्या दशकाच्या अखेरीस झालं होतं, पण प्रदर्शित होण्यासाठी जवळपास पाच वर्षे थांबावं लागलं. त्या काळात माधुरी दीक्षित आपल्या स्टारडमच्या शिखरावर होती. तिचं नाव बॉक्स ऑफिसवर सुपरहिटची हमी मानलं जात होतं. इतकंच नव्हे तर "पापी देवता"च्या सीडी आणि कॅसेट्सवर केवळ माधुरीचं फोटो झळकत होतं. धर्मेंद्र, जितेंद्र, जया प्रदा यांसारखे ज्येष्ठ कलाकार असूनही प्रमोशनमध्ये माधुरीचं वर्चस्व दिसलं.
पण एवढं असूनही हा सिनेमा वाचवता आला नाही. जुन्या कथा, दमदार पण कालबाह्य झालेलं सादरीकरण आणि प्रेक्षकांच्या बदललेल्या आवडीमुळे चित्रपटाला प्रतिसाद मिळाला नाही. माधुरीचं स्टारडम जरी कितीही मोठं असलं, तरी एका जुनाट चित्रपटाला वाचवणं शक्य झालं नाही.