या दुकानात कानातले फक्त 3 रुपयांपासून सुरू होतात, जे बाजारात विक्रीसाठी मोठ्या फायद्याचे ठरू शकतात. येथे मिळणारी सर्व ज्वेलरी प्रीमियम क्वालिटीची असून त्यात विविध रंग, डिझाइन्स आणि प्रकारांची भरपूर व्हरायटी आहे. प्युअर ब्रासचे कानातले येथे फक्त 35 रुपये प्रति पीस दराने मिळतात, जे तुम्ही बाजारात 100 रुपयांपर्यंत विकू शकता. या दरात इतका दर्जा मिळणे दुर्मीळ आहे.
advertisement
Yoga: वय 66 वर्षे, योगामध्ये मिळवली 200 हून अधिक सुवर्णपदके, पुण्यातील अलका यांची प्रेरणादायी कहाणी
याशिवाय, गोल्डन, सिल्वर आणि रोझ गोल्ड फिनिश असलेले प्रीमियम कानातले फक्त 40 रुपयांपासून उपलब्ध आहेत. कॉम्बो पॅकिंगमध्ये येणारी कानातल्यांची रेंज फक्त 70 रुपयांपासून सुरू होते. येथे एकूण 200 ते 300 प्रकारांचे कानातले उपलब्ध असून प्रत्येकाची डिझाइन अनोखी आणि आधुनिक ट्रेंडला अनुसरलेली आहे.
अगदी लहान टॉप्स देखील येथे अत्यंत स्वस्त दरात 3 रुपये प्रति पीस किंवा 36 रुपये डझन दराने मिळतात. याशिवाय फॅशनेबल आणि रंगीबेरंगी ऑक्सिडाइझ झुमके देखील फक्त 15 रुपयांपासून येथे मिळतात. काही प्रकारचे कानातले तर 18 रुपये डझन या अविश्वसनीय दरात उपलब्ध आहेत.
हे पूर्णपणे होलसेल दुकान असल्यामुळे येथे खरेदी करताना किमान 1500 ते 2000 रुपयांची खरेदी करावी लागते. परंतु या किमतीत मिळणाऱ्या दर्जेदार वस्तूंमुळे व्यवसायासाठी हे एक अत्यंत फायदेशीर ठिकाण ठरू शकते. जर तुम्ही इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर नागेश्वर इमिटेशन ज्वेलरी या दुकानाला नक्की भेट द्या. दर्जा, किमती आणि वेरायटी या तिन्ही गोष्टींचा समतोल येथे उत्तमरीत्या जपलेला आहे.