Salman Khan: 'प्रचंड वेदना, खूप त्रास व्हायचा', सलमान खानला गंभीर आजार, अनेक वर्षांपासून देतोय झुंज
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Salman Khan: बॉलिवूडचा भाईजान म्हणून ओळखला जाणारा सलमान खान नेहमीच त्याच्या अॅक्शन, स्टाईल आणि फिटनेससाठी चर्चेत असतो.
मुंबई : बॉलिवूडचा भाईजान म्हणून ओळखला जाणारा सलमान खान नेहमीच त्याच्या अॅक्शन, स्टाईल आणि फिटनेससाठी चर्चेत असतो. पण अलीकडेच त्याने एका शोदरम्यान त्याच्या आरोग्याशी संबंधित मोठं रहस्य उघड केलं, जे फार कमी लोकांना माहीत होतं. त्याने त्याच्या आजाराविषयी सांगताच चाहते शॉक झाले.
अमेझॉन प्राइमवरील "Too Much with Kajol and Twinkle" या शोमध्ये सलमान खान आणि आमिर खान दोघेही पाहुणे म्हणून आले होते. इथे सलमानने सांगितलं की तो अनेक वर्षं एका गंभीर आजाराशी झुंज देत होता. ज्याचं नाव आहे, ट्रायजेमिनल न्युरॅल्जिया.
advertisement
काय आहे हा आजार?
हा आजार मज्जातंतूंवर परिणाम करतो. चेहरा, डोळा, नाक किंवा जबडा यामध्ये अचानक विजेच्या झटक्यासारखी वेदना जाणवते. हा आजार "सुसाईड डिसीज" म्हणूनही ओळखला जातो कारण या वेदना असह्य असतात.
सलमानने शोमध्ये सांगितलं की या आजारामुळे त्याचं दैनंदिन जीवन पूर्णपणे बदललं होतं. नाश्ता करण्यासाठी त्याला दीड-दोन तास लागायचे. साधं ऑम्लेट खाणंसुद्धा कठीण झालं होतं. तो म्हणाला, "माझ्या आयुष्यातील हा काळ खूप त्रासदायक होता. ऊर्जा मिळवण्यासाठी मला वेदना सहन करत खावं लागायचं."
advertisement
सुरुवातीला सलमानला वाटलं की ही दातांची समस्या आहे. त्याने 750 मिलिग्रॅमपर्यंत वेदनाशामक औषधं घेतली. पण औषधं घेतल्यानंतरही त्रास वाढत गेला. डॉक्टरांनी तपासल्यानंतर खरे कारण समोर आलं, मज्जातंतूंची समस्या. सलमानने एक किस्सा शेअर केला. २००७ मध्ये "पार्टनर" चित्रपटाच्या सेटवर अभिनेत्री लारा दत्ता त्याच्या चेहऱ्यावरील केस काढत होती. त्या क्षणी सलमानला अचानक तीव्र विजेचा झटका बसल्यासारखी वेदना झाली. त्यावेळी त्याला जाणवलं की ही समस्या साधी नाही.
advertisement
सलमान खानने चाहत्यांना दिलासा दिला की आता तो खूप बरा आहे. मात्र त्याला अजूनही काही आरोग्य समस्या आहेत जसे की एन्युरिझम आणि धमनी विकृती. पण तो म्हणाला की आता त्याला या आजारांशी लढायचं कसं ते माहित आहे. सलमानने सांगितलं की आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी हार मानू नये. "लढत राहणं हेच खरं जीवन आहे,"
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 25, 2025 2:31 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Salman Khan: 'प्रचंड वेदना, खूप त्रास व्हायचा', सलमान खानला गंभीर आजार, अनेक वर्षांपासून देतोय झुंज