Post Office: पोस्टमन करतात कामचोरी? ठाण्यात नागरिकांनाच माराव्या लागतात पोस्टाच्या चकरा
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Post Office: पोस्ट कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईमुळे अनेकांपर्यंत महत्त्वाची कागदपत्रे पोहचत नसल्याची धक्कादायक बाब बदलापुरात उघड झाली आहे.
ठाणे: आता संवादासाठी आणि ख्यालीखुशाली विचारण्यासाठी मोबाईल फोनसारखी डिजिटल माध्यमं आली आहेत. त्यामुळे पत्रव्यवहार मागे पडला आहे. असं असलं तरी, सरकारी कागपत्रे, बँकांची, इन्शुरन्सची कागपत्रे नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी पोस्टाचाच वापर होतो. मात्र, पोस्ट कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईमुळे अनेकांपर्यंत महत्त्वाची कागदपत्रे पोहचत नसल्याची धक्कादायक बाब बदलापुरात उघड झाली आहे. पोस्ट ऑफिसच्या भोंगळ कारभारामुळे आणि उद्धट कर्मचाऱ्यांमुळे नागरिकांनाच आपली पत्रं शोधावी लागत आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, काही पोस्टमन मूळ पत्त्यावर न जाताच खोटे शेरे टाकून पत्र कार्यालयातचं ठेवत असल्याचा प्रकार घडत आहे. त्यामुळे स्पीड पोस्ट प्रकारासाठी पैसे खर्चूनही स्वखर्चानेच कार्यालय गाठून पत्रे मिळवावी लागत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. जाब विचारण्यासाठी जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांकडून पैसे देखील घेतले जात आहेत.
advertisement
काही नागरिकांनी केलेल्या तक्रारीनुसार, बदलापूर शहरातील कुळगाव पोस्ट ऑफिसमध्ये नवीन पोस्टमन दाखल झाले आहेत. हे नवीन कर्मचारी नागरिकांची पत्रं पोहोचवण्याची जबाबदारी नीट पार पाडत नाहीत. त्यामुळे नागरिकांनाच पोस्ट ऑफिसच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. पोस्टात जाऊन विचारणा केल्यास काही कर्मचारी अरेरावाची भाषा देखील वापरत आहेत.
आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट किंवा इतर महत्वाची पत्रं घरी येण्याची नागरिक वाट बघत असतात. ते पत्र कुठे पोहोचलं हे संबंधित वेबसाईटवर दाखवलं जातं. मात्र, ते घरी पोहचत नसल्याने नागरिकांच पोस्टात गर्दी करावी लागत आहे. त्यासाठी वेळ आणि पैसेही खर्च करावे लागत आहेत. येथील कुळगाव पोस्ट ऑफिस अत्यंत दाटीवाटीत असून नागरिकांना उभं राहण्यासाठी देखील जागा नाही.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
September 25, 2025 2:25 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Post Office: पोस्टमन करतात कामचोरी? ठाण्यात नागरिकांनाच माराव्या लागतात पोस्टाच्या चकरा