Health Campaign: मोफत ऑपरेशन आणि चष्मेही मिळणार! कुठे आणि कसा मिळणार लाभ?

Last Updated:

Health Campaign: आर्थिक अडचणीत असलेल्या लोकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्यास मदत होत आहे.

मोफत ऑपरेशन आणि चष्मेही मिळणार! कुठे आणि कसा मिळणार लाभ?
मोफत ऑपरेशन आणि चष्मेही मिळणार! कुठे आणि कसा मिळणार लाभ?
कल्याण: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत विविध उपक्रमांचा शुभारंभ केलेला आहे. याच उपक्रमात महाराष्ट्र सरकार देखील सहभागी आहे. राज्यात सरकारतर्फे नागरिकांच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी 'नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान' राबवले जात आहे. या विशेष उपक्रमात राज्यातील 10 लाखांहून अधिक नागरिकांची मोफत नेत्रतपासणी, शस्त्रक्रिया आणि औषधोपचार होणार आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या अभियानाअंतर्गत जिल्हा, तालुका तसेच गावपातळीपर्यंत नेत्रशिबिरांचं आयोजन केलं जाणार आहे. शासकीय रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालये आणि स्वयंसेवी संस्थाही या उपक्रमात सहभागी होणार आहेत. शिवाय, मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना मोफत चष्मे दिले जाणार आहेत. काचबिंदूसह इतर नेत्रविकारांवरील निदान, सल्ला आणि उपचारही केले जाणार आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांपर्यंत मोफत सेवा पोहोचवणे, हे अभियानाचं प्रमुख उद्दिष्ट आहे.
advertisement
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात दरवर्षी लाखो नागरिक मोतीबिंदू, काचबिंदू आणि इतर नेत्रविकारांनी आपली दृष्टी गमावत आहेत. विशेषतः 50 वर्षांवरील नागरिकांमध्ये मोतीबिंदूचे प्रमाण सर्वाधिक आहे. ग्रामीण भागात योग्य उपचार न मिळाल्याने अनेक रुग्ण दृष्टी गमावतात. यावर उपाय म्हणून हा विशेष उपक्रम राबवला जात आहे.
advertisement
या अभियानांतर्गत गरजूंना मोफत शस्त्रक्रिया आणि औषधोपचार सुविधा मिळणार आहेत. मोतीबिंदू आणि इतर नेत्ररोगांवर उपचार करून रुग्णांच्या दृष्टीसंबंधी समस्या दूर करण्यात येत आहेत. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या लोकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्यास मदत होत आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Health Campaign: मोफत ऑपरेशन आणि चष्मेही मिळणार! कुठे आणि कसा मिळणार लाभ?
Next Article
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement