रेल्वेकडून नागपूरकरांना दिवाळीनिमित्त खास भेट, राज्यातून आणखी एक धावणार 'अमृत भारत' ट्रेन; कसा असेल मार्ग
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
सामान्य प्रवाशांच्या खिशाला परवडणारी आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा देणाऱ्या अमृत भारत ट्रेनच्या माध्यमातून भारत सरकारने प्रवाशांना मोठं गिफ्ट दिलंय. गुजरात ते ओडिशा पर्यंत धावणाऱ्या रेल्वेची घोषणा रेल्वे मंत्रालयाने केली आहे.
भारतीय रेल्वे ही जगातील मोठी प्रवासी सेवा समजली जाते. तसेच पर्यटक व अन्य विविध ठिकाणी प्रवास करण्यासाठी रेल सेवेस प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. भारतीय रेल्वे दिवसेंदिवस अपडेट होताना दिसत आहे. कायमच सोशल मीडियावर चर्चेत राहणाऱ्या अमृत भारत ट्रेनबद्दल एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सामान्य प्रवाशांच्या खिशाला परवडणारी आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा देणाऱ्या अमृत भारत ट्रेनच्या माध्यमातून भारत सरकारने प्रवाशांना मोठं गिफ्ट दिलंय. गुजरात ते ओडिशा पर्यंत धावणाऱ्या रेल्वेची घोषणा रेल्वे मंत्रालयाने केली आहे.
रेल्वे मंत्रालयाने गुजरातमधील सुरतच्या उधना रेल्वे स्थानकापासून ओडिशाच्या ब्रह्मपूर रेल्वे स्थानकापर्यंत अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन सुरु करण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे राज्यातील अनेक मोठमोठ्या स्थानकांवरून धावणार आहे. सामान्य प्रवाशांच्या खिशाला परवडणाऱ्या आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा देणार्या या ट्रेनचा महाराष्ट्राला सर्वाधिक फायदा होणार आहे. अमृत भारत एक्सप्रेस ट्रेनचा वेग अंदाजे 160 ते 180 किमी/ ताशी असेल, या ट्रेनला एकूण 22 कोचेस असणार आहेत. त्यापैकी 11 सामान्य श्रेणीचे कोच, 8 स्लीपर श्रेणीचे कोच, 1 पँट्री कार, 2 लगेज कम ब्रेक व्हॅन कोच आणि या व्यतिरिक्त एक कोच अपंग प्रवाशासाठी राखीव असेल.
advertisement
अमृत भारत एक्सप्रेसमुळे गुजरात आणि महाराष्ट्र राज्यामध्ये हातावर पोटाची खळगी भरणारे कामगार आणि इतरत्र कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या नोकरदारांनाही ही ट्रेन सोयीची ठरणार आहे. गुजरात, महाराष्ट्र आणि ओडिशा राज्यातील मोजक्या भागातील लोकांसाठी ही ट्रेन फार सोयीची ठरणार आहे. सुट्टीच्या हंगामात या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जलद आणि थेट कनेक्टिव्हिटीचा आनंद घेता येईल. रेल्वे मंत्रालयाच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, "ब्रह्मपूर ते सुरत (उधना) ही नवीन अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन मध्यमवर्गीय आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना परवडणारी सेवा आणि उच्च दर्जाचा प्रवास अनुभव प्रदान करेल."
advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 27 तारखेला या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवत उद्घाटन करणार आहेत. सुरत (उधना) ते ब्रह्मपूर मार्गावर ट्रेन आठवड्यातून एकदा चालवली जाणार आहे. ही ट्रेन दर रविवारी उधना रेल्वे स्थानकावरुन सकाळी 07:10 वाजता सुटून दर सोमवारी दुपारी 13:55 वाजता ब्रम्हपूर इथं पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात ही रेल्वे दर सोमवारी ब्रम्हपूर इथून रात्री 11:45 वाजता सुटून बुधवारी सकाळी 08:45 वाजता उधना इथं पोहोचेल. नव्यानं सुरु होणारी सुरत (उधना)- ब्रम्हपूर अमृत भारत ट्रेन महाराष्ट्रामधील नवापूर, नंदुरबार, दोंडाईचा, शिंदखेडा, अमळनेर, धरणगाव, जळगाव जंक्शन, भुसावळ जंक्शन, मलकापूर, अकोला जंक्शन, बडनेरा जंक्शन, वर्धा, नागपूर जंक्शन, गोंदिया जंक्शन या रेल्वे स्थानकावर थांबणार आहे.
advertisement
भारतीय रेल्वेने 'अमृत भारत' एक्सप्रेसच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये प्रवासाच्या नव्या पर्वाची सुरुवात केली आहे. ही नॉन- एसी सुपरफास्ट ट्रेन स्वस्त, जलद आणि आरामदायी प्रवासाचा प्रवाशांना पर्याय देत आहे. वंदे भारत नंतर आता अमृत भारतचं जाळंही राज्यासह संपूर्ण देशामध्ये हळूहळू वाढताना दिसत आहे
Location :
Maharashtra
First Published :
September 25, 2025 2:18 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
रेल्वेकडून नागपूरकरांना दिवाळीनिमित्त खास भेट, राज्यातून आणखी एक धावणार 'अमृत भारत' ट्रेन; कसा असेल मार्ग