Pune Dive Ghat Closed : मोठी बातमी! दिवे घाटावर उद्या विशेष ब्लॉक; वाहतूक 3 तास राहणार पूर्णत:बंद,पर्याय मार्ग कोणते?

Last Updated:

Pune Dive Ghat Closed : पुणे-मुंबई मार्गावरील दिवे घाट येथे देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. प्रवाशांना मोठा त्रास होऊ नये म्हणून वाहतूक विभागाने पर्यायी मार्गांची व्यवस्था केली आहे.

News18
News18
पुणे : दिवे घाटातून प्रवास करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आळंदी ते पंढरपूर या पालखी महामार्गावर सध्या रुंदीकरणाचे मोठे काम सुरू आहे. या कामामुळे येत्या शुक्रवार, 26 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दिवेघाटातील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने ही माहिती दिली असून वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
या दिवशी दिवेघाटात रस्ता रुंदीकरणासाठी ब्लास्टिंग करण्यात येणार आहे. ब्लास्टिंगदरम्यान मोठ्या दगडांचे तुकडे उडण्याची शक्यता असते, त्यामुळे अपघात टाळण्यासाठी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे हडपसर ते दिवेघाट मार्गावर गाड्या चालणार नाहीत.
याआधीही रस्त्याच्या रुंदीकरणासाठी असेच ब्लास्टिंग करण्यात आले होते आणि त्यावेळीही दिवेघाट मार्गावर वाहनांची ये-जा बंद ठेवण्यात आली होती. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 अंतर्गत येतो. पुणे आणि आसपासच्या भागातून सांगली, सोलापूर, पंढरपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी रहदारी या रस्त्याने होते. त्यामुळे बंदोबस्तामुळे गाड्यांची गर्दी वाढू शकते, अशी शक्यता आहे.
advertisement
पर्यायी मार्ग वाहनधारकांसाठी
NHAI आणि प्रशासनाने काही पर्यायी मार्ग सांगितले आहेत, ज्यांचा वापर वाहनधारक करू शकतात:
कात्रज – बोपदेव घाट : राज्य मार्ग क्रमांक 131 मार्गे सासवड.
खेडशिवापूर – सासवड लिंक रोड : या मार्गाने प्रवास शक्य.
कापूरहोळ – नारायणपूर : राज्य मार्ग क्रमांक 119 वापरता येईल.
हडपसर – उरुळी कांचन – शिंदवणे घाट : राज्य मार्ग क्रमांक 61 मार्गे सासवडला जाता येईल.
advertisement
प्रशासनाने प्रसिद्धीपत्रक काढून नागरिकांना सहकार्याची विनंती केली आहे. भविष्यातही रस्त्यावर असे ब्लास्टिंगचे काम सुरू होणार असून, त्यावेळी वाहनचालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
वाकड ब्रिजवरील वाहतूक बदल
दिवेघाटासोबतच, पिंपरी-चिंचवड परिसरातील वाकड ब्रिजवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठीही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी यासंदर्भात नवे नियम लागू केले आहेत.
advertisement
सकाळच्या वेळेला, वाकडहून हिंजवडीकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असते. आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी मोठ्या प्रमाणात हिंजवडीकडे जातात. त्यामुळे सकाळी वाकड ब्रिजवर प्रचंड कोंडी होते. या समस्येवर उपाय म्हणून सकाळी वाकडहून हिंजवडीकडे जाणाऱ्या मार्गासाठी तीन लेन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याच वेळी, हिंजवडीहून वाकडकडे येणाऱ्या वाहनांसाठी फक्त एकच लेन ठेवली आहे.
advertisement
सायंकाळी मात्र उलट परिस्थिती होते. काम संपल्यानंतर कर्मचारी मोठ्या संख्येने हिंजवडीतून वाकडकडे परततात. त्यामुळे गर्दी कमी करण्यासाठी सायंकाळी हिंजवडीहून वाकडकडे येणाऱ्या मार्गावर तीन लेन ठेवण्यात आल्या आहेत. तर, वाकडहून हिंजवडीकडे जाणाऱ्या गाड्यांसाठी एक लेन ठेवण्यात आली आहे.
या बदलामुळे हिंजवडीतील आणि वाकड ब्रिजवरील वाहतूक कोंडी कमी होईल, असा दावा पोलिसांनी केला आहे. तसेच, आयटी पार्क परिसरातील इतर रस्त्यांवरील वाहतूक व्यवस्थेसाठीही विविध उपाययोजना सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मराठी बातम्या/पुणे/
Pune Dive Ghat Closed : मोठी बातमी! दिवे घाटावर उद्या विशेष ब्लॉक; वाहतूक 3 तास राहणार पूर्णत:बंद,पर्याय मार्ग कोणते?
Next Article
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement