देशमुखांच्या घरी प्रत्येक सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि याची अपडेट जिनिलीया नेहमीच तिच्या चाहत्यांना देत असते. यंदाही तिने गणपती बाप्पाच्या निरोपाचा एक हृदयस्पर्शी व्हिडिओ शेअर केला आहे.
रितेश देशमुखने मुलांसह गणपती बाप्पाला दिला निरोप
या व्हिडिओमध्ये रितेश बाप्पाची मूर्ती हातात घेऊन उभा आहे. त्याच्यासोबत त्याचे दोन्ही मुलगे, रियान आणि राहिल दिसत आहेत. वडील-मुलांची ही जोडी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ चा जयघोष करत आहे. मुलंही रितेशच्या मागे मोठ्या उत्साहात घोषणा देताना दिसत आहेत.
advertisement
जिनिलीयाने हा व्हिडिओ शेअर करताना एक कॅप्शन लिहिलं आहे, “निरोप हा नेहमीच दुःखद असतो. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!”
रितेश आणि जिनिलीया ही बॉलिवूडसोबतच मराठी इंडस्ट्रीतीलही एक लोकप्रिय जोडी आहे. त्यांची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्री नेहमीच प्रेक्षकांना आवडते. आपल्या मुलांवर संस्कार करत आणि मराठमोळी संस्कृती जपल्याबद्दल त्यांचे चाहते नेहमीच सोशल मीडियावर त्यांचे कौतुक करत असतात.