अनेकदा सोशल मीडियावर ईशाला बंगाली अभिनेत्री असल्याचं म्हटलं जातं. बंगाली असूनही अस्खलित मराठी बोलता येत असल्याने प्रेक्षकांकडून नेहमीच तिचं कौतुक केलं जातं. पण ईशा बंगाली नसून महाराष्ट्रीयन आहे.
( Gaurav More : प्रसिद्ध मिळाली, पैसाही मिळतोय, तरीही गौरव मोरे पवईच्या फिल्टर पाड्यात का राहतो? )
ईशाचं खरं नाव काय?
advertisement
एका मुलाखतीत बोलताना ईशा म्हणाली, “माझं खरं नाव ईशा वडनेरकर आहे. मी ड्रामा स्टुडिओ लंडनमध्ये शिकत होते तर तिथे जनरल ई स्टेज नेम स्क्रीन घेण्याची पद्धत आहे. आमच्या कोर्सच्या शेवटच्या दिवसात आम्ही कास्टिंग ऑडिशन्सला जायला लागलो. तिथे पंक्च्युअॅलिटी खूप पाळली जाते. त्यामुळे १५-१५ मिनिटांचे कास्टिंगचे ऑडिशनचे स्लॉट्स असायचे. असं मला दोन-तीनदा अनुभव आला की, मी ऑडिशनला गेली आहे आणि 'व्हॉट्स यॉर नेम?' असं विचारल्यावर मी 'ईशा वडनेरकर' असं म्हटलं. त्यानंतर त्यांना माझं आडनाव नीट बोलता यायचं नाही. त्या सगळ्यात १५ मिनिटे निघून जायची. ऑडिशनला १० मिनिटे मिळायची.”
नाव बदलण्यासाठी घेतली आई-बाबांची परवानगी
ईशा पुढे म्हणाली, “तिकडे माझे मेंटर होते जॉनी कॅम्प म्हणून. तर त्यांनी मला सांगितलं की, 'इथे सगळेच वेगळं नाव घेतात. तुला हवं तर घे काहीतरी नाव वेगळं.' मला असं वाटलं की हा ठीक आहे हरकत आहे. मग मी आई बाबाच वगैरे बोलले. आई-बाबा लहानपणापासून जे मी जे म्हणेन त्याला सपोर्टिव्ह असायचे. त्यामुळे त्यांनीही हो म्हटलं.”
नव्या नावासाठी केली शोधाशोध
ईशा म्हणाली, “आई-बाबा हो म्हणाल्यानंतर काय करायचं म्हणून आम्ही सगळे एकत्र बसून काही वेगळे शब्द काढता येतील याचा विचार केला. माझा विचार होता की मी इंडियन आहे पण कळलं पाहिजे आणि सोपा शब्द पण पाहिजे. कारण का मला अजूनही वेस्टमध्ये काम करण्याची इच्छा आहे. त्यामुळे माझी इच्छा होती की सोपा शब्द असावा. मी कास्ट तिकडे जरी झाले कुठल्या इंग्लिश वेब सिरीजमध्ये, मला फिल्मध्ये तरी मी इंडियन म्हणूनच होणार आहे कारण मी दिसते इंडियन. तर मग आम्ही अनेक नावं काढली आणि मग 'साउंड्स गुड ईशा डे' असा काहीतरी छान वाटलं. त्यामुळे मी ईशा डे असं नाव निवडलं.”
