Gaurav More : प्रसिद्ध मिळाली, पैसाही मिळतोय, तरीही गौरव मोरे पवईच्या फिल्टर पाड्यात का राहतो?

Last Updated:

गौरव मोरेचं बालपण फार संघर्षात गेलं. सुरूवातीला हो उल्हासनगरमधील स्टेशनच्या बाजूला ताडपत्री असलेल्या घरात राहायचा. मग तो फिल्टरपाड्यात कसा आला? अजूनही तो तिथेच का राहतो? पाहूयात.

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरे
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरे
मुंबई : महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शोमधून नावारुपास आलेला गौरव मोरे आज एक लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो गौरव मोरेच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरे अशी ओळख असलेला गौरव मोरे आजही किती मोठा अभिनेता झाला असला तरी त्याचे पाय जमिनीवर असल्याचं पाहायला मिळतं. फिल्टरपाड्याचा बच्चन म्हणजेच पवईच्या फिल्टरपाड्यातील एक वस्तीत राहणारा गौरव मोरे तिथला बच्चन आहे. त्यानं त्याच्या कामातून आपली ओळख निर्माण केली आहे. आजही गौरव मोरे त्याच फिल्डपाड्यात राहतो. एकेकाळी काम मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या गौरव मोरेकडे आज अनेक सिनेमांच्या ऑफर्स येत आहेत. त्याची स्वत:ची एक वेगळी फॅन फॉलोविंग आहे. पण तरीही तो फिल्टरपाड्याच्या चाळीत का राहतो? असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? पाहूयात याच प्रश्नाचं उत्तर.
गौरव मोरेचं बालपण फार संघर्षात गेलं. सुरूवातीला हो उल्हासनगरमधील स्टेशनच्या बाजूला ताडपत्री असलेल्या घरात राहायचा. त्यानंतर काही दिवसांनी तो विठ्ठलवाडी स्टेशनजवळ पाहू लागला. तिथल्या वातावरणाचा त्रास झाल्यानं गौरवला घेऊन त्याची आई कल्याणला राहायला आली. त्यानंतर वडिलांची बदली भांडूपला झाली आणि संपूर्ण कुटुंब पवईच्या फिल्टरपाड्यात राहायला आलं.
पवईच्या फिल्टरपाड्यात ताडपत्री असलेल्या घरात गौरव मोरे आजही राहतो. ताडपत्री म्हणजे ताडाच्या झाडाचं लाकूड वापरून तयाक करण्यात आलेली घरं. या घरात पावसाळ्याच्या दिवसात छतातून पाणी गळायचं. गौरवनं एका मुलाखतीत सांगितलं होतं, पावसाळ्याच्या दिवसात आमच्या घरातील एक माणूस पाणी साचू नये म्हणजे घरात टोप लावून बसायचा.
advertisement
प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले-वाईट दिवस येतात आणि जातात. गौरव मोरंनं देखील अनेक वर्ष संघर्षातून आयुष्यात चांगले दिवस आणले. हास्यजत्रेनं त्याला ओळख मिळवून दिले. गौरव आता चांगले पैसे देखील कमावत आहे. अनेक कलाकार आहेत ज्यांनी सक्सेस मिळाल्यानंतर नव्या घरात राहणं पसंत केलं. पण गौरव मोरे मात्र आजही त्याच्या फिल्टरपाड्याच्या घरातच राहतोय. असं का? हे सांगताना तो म्हणाला, फिल्टर पाडा ही आरे कॉलनीतील एक जागा आहे. फिल्टर पाड्याच्या भोलती जंगल आहे. जंगलाच्यामध्ये छोटी वस्ती आहे.
advertisement
माझं बालपण फिल्टपाड्यात गेलं आहे. फिल्टरपाडा माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. मुंबई हे जगातील आवडतं शहर आहे. माझं संपूर्ण कुटुंब फिल्टरपाड्यात राहतं. माझे अनेक मित्र आर्थिकदृष्ट्या स्थिर झाले की फिल्मटरपाड्यात राहणं नको म्हणतात तेव्हा मला खूप वाईट वाटतं. ज्या जागेनं आपल्याला आसरा दिला त्या जागेबद्दल असं बोलंणं मला खटकतं.
मला अजूनही फिल्टरपाड्याबद्दल प्रेम आहे. मी अजूनही तिथे राहतो. माझ्या घरी येऊन लोक फोटो काढतात. मला त्याचा खूप अभिमान वाटतो, असंही गौरव मोरेनं सांगितलं.
advertisement
फिल्टरपाड्याचा बच्चन असं गौरव मोरेला का म्हणतात? हे सांगताना तो म्हणाला, अमिताभ बच्चन मला खूप आवडतात. त्यांची हम सिनेमातील स्टाइल मला खूप आवडते. मी एकांकिकेत काम करायचो. एकदा एका एकांकिकेत बिग बींसारखी एंट्री घेतली. माझी ती स्टाइल सगळ्यांना आवडली. त्यानंतर हास्यजत्रेतही मी एकदा अशीच एंट्री घेतली आणि माझी ती स्टाईल फेमस झाली. तेव्हा पासून सगळे फिल्टपाड्याचा बच्चन म्हणून लागले.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Gaurav More : प्रसिद्ध मिळाली, पैसाही मिळतोय, तरीही गौरव मोरे पवईच्या फिल्टर पाड्यात का राहतो?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement