असं म्हणतात की, बालपणी ज्या गोष्टी घडतात त्याचे पडसाद मुलांवर पडतात आणि ते आयुष्यभर राहतात. महेश भट्ट यांच्या बाबतीतही तसंच झालं. नानाभाई भट्ट आणि शिरीन मोहम्मद अली असं महेश भट्ट यांच्या आई- वडिलांचं नाव. महेश भट्ट यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार अनुभवले आहेत. महेश यांना पाच भावंड होती. रॉबिन भट्ट, हीना सुरी, शीला भट्ट आणि मुकेश भट्ट. हे सगळे चित्रपट निर्मिती क्षेत्रात आहेत.
advertisement
जिथे आजही समाज लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल मोकळेपणाने बोलू शकत नाही तेव्हा त्या काळात महेश भट्ट यांचे वडील नानाभाई आणि त्यांची आई शिरीन लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिरीन आणि नानाभाई यांनी कधीही लग्न केले नाही. नानाभाई चित्रपट निर्माते होते आणि त्यांची आई शिरीन एक प्रसिद्ध अभिनेत्री होती.
स्मिता पाटील आणि विनोद खन्नाचे सेक्रेटरी
महेश आज ज्या पदावर आहेत ते मिळवण्यासाठी खूप संघर्ष केला आहे. असे म्हटले जाते की महेश भट्ट यांनी शाळेत असतानाच पैसे कमविण्यासाठी अर्धवेळ नोकरी करायला सुरुवात केली. वयाच्या 20 व्या वर्षी ते जाहिरातींसाठी लिहू लागले. एक काळ असा होता जेव्हा ते हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री स्मिता पाटील आणि विनोद खन्ना यांचे सेक्रेटरी म्हणून काम केलं. वयाच्या 26 व्या वर्षी महेश यांनी चित्रपटांची निर्मिती करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये लक्षणीय यश मिळवले.
विनोद खन्ना यांनी दिला त्रास
विनोद खन्ना यांच्याबद्दल एक प्रसिद्ध कथा आहे. जेव्हा महेश चित्रपट निर्माता-दिग्दर्शक बनले तेव्हा त्यांनी विनोद खन्ना यांच्यासोबत चित्रपट बनवण्याचा विचार केला आणि त्यांना मुख्य अभिनेता म्हणून साइन केले. विनोद यांनी सलग 40 दिवसांचे शूटिंग रद्द केले. या वागण्याने महेश यांना राग आला आणि त्यांनी विनोद खन्ना यांच्यासोबत कधीही चित्रपट न करण्याची शपथ घेतली.
महेश भट्ट यांचे दोन लग्न आणि चार मुले
महेश भट्ट यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, त्यांचे पहिले लग्न लॉरेन ब्राइटशी झाले होते. ज्यांचे नाव नंतर किरण भट्ट असे बदलण्यात आले. त्यांना पूजा भट्ट आणि राहुल भट्ट ही दोन मुले होती. लॉरेनसोबतचे त्यांचे लग्न तुटल्यानंतर त्यांनी सोनी राजदानशी लग्न केले. सोनी आणि महेश यांना आलिया भट्ट आणि शाहीन भट्ट या दोन मुली आहेत.