'होमबाउंड' चित्रपटाच्या प्रीमियरसाठी बॉलिवूडची अनेक मंडळी एकत्र आली होती. इशान खट्टर, जान्हवी कपूर आणि विशाल जेठवा यांच्यासह अर्जुन कपूर आणि मलायका अरोराही एकत्र दिसले. दोघांच्या भेटीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
( 70sची बिनधास्त अभिनेत्री! 16व्या वर्षी शिक्षण सोडलं, एका 'थप्पड' बदललं आयुष्य )
व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय की, अर्जुन नेहा धुपिया सारख्या इतर सह-कलाकारांशी छान संवाद साधतोय. पण तो थोड तणावातही आहे. कारण समोरच मलायका देखील उभी आहे. जवळच उभी असलेली मलायका अर्जुनशी बोलली नाही किंवा त्याच्याकडे पाहिले नाही. काही वेळ शांतपणे उभी राहिल्यानंतर, मलायका हळूहळू निघून गेली.
advertisement
हा व्हिडीओ पाहून अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एका युझरने लिहिलंय, "ब्रेकअपनंतर काही लोक इतके थंड होतात की तुम्हाला त्यांच्यावर प्रेम केल्याचा पश्चात्ताप होतो." दुसऱ्याने म्हटले, "जे लोक आधी सर्वकाही शेअर करायचे ते आता अनोळखी लोकांसारखे वागतात."
दरम्यान याच कार्यक्रमातील आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात मलायका रेड कार्पेटवर पोज देण्यासाठी उभी आहे. त्यानंतर मलायका समोर आलेल्या अर्जुन कपूर आणि दिग्दर्शक नीरज घायवान यांची घावती भेट घेते. ती त्यांच्याकडे जाते आणि त्यांना मिठी मारते. या व्हिडीओमुळे चाहतेही गोंधळले आहेत. मलायकाचं चाललंय काय असा प्रश्न विचारला जात आहे.
अर्जुन आणि मलायका यांचा 2024 ब्रेकअप झाल्याची बातमी समोर आली. त्यानंतर अर्जून मलायकाचं एकत्र स्पॉट होणं थांबलं. दरम्यानम मलायकाच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर तो तिच्या घरी जाऊन तिचं सांत्वन करताना दिसला होता. त्यानंतर आता प्रीमियरमध्ये दोघे पुन्हा स्पॉट झाले. दोघांच्या नात्यात नेमकं काय सुरू आहे याचा थांगपत्ता कोणालाही लागत नाहीये.
दरम्यान एका मुलाखतीत मलायका म्हणाली होती की, "मी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाने मग तो व्यावसायिक असो वा वैयक्तिक... आज मी कोण आहे यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मला कोणत्याही गोष्टीचा पश्चात्ताप नाही. मी खऱ्या प्रेमावर कधीही आशा सोडणार नाही."