TRENDING:

Malaika Arora Father Death: वडिल अनिल अरोराच्या निधनानंतर मलायकाची पहिली पोस्ट, म्हणाली...

Last Updated:

अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांच्या निधनाने सध्या सर्वांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी आत्महत्या करत आयुष्य संपवलं. त्यांच्या जाण्याने शोककळा पसरली असून लोक धक्क्यात आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांच्या निधनाने सध्या सर्वांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी आत्महत्या करत आयुष्य संपवलं. त्यांच्या जाण्याने शोककळा पसरली असून लोक धक्क्यात आहेत. त्यांच्या अचानक जाण्याने अरोरा कुटुंब पूर्णपणे कोसळले आहे. वडिलांच्या निधनानंतर मलायका अरोराने पहिली पोस्ट शेअर केली आहे.
वडिल अनिल अरोराच्या निधनानंतर मलायकाची पहिली पोस्ट
वडिल अनिल अरोराच्या निधनानंतर मलायकाची पहिली पोस्ट
advertisement

मलायका वडिलांच्या निधनानंतर पहिल्यांदाच व्यक्त झाली आहे. तिने सोशल मीडियावर पहिली पोस्ट शेअर केलीय. 'माझे वडील अनिल अरोरा यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. खूप चांगली व्यक्ती, चांगले आजोबा, प्रेमळ नवरा आणि आमचा चांगला मित्र होते. या घटनेमुळे आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.'

Anil Arora Suicide: आत्महत्येपूर्वी अनिल अरोरा यांनी अमृताला का केला फोन? बायको घरी असताना लेकीशी बोलले शेवटचं

advertisement

मलायकाने पुढे लिहिले, 'या कठीण काळात मीडिया आणि हितचिंतकांकडून गोपनीयतेची विनंती करत आहोत. तुमच्या पाठिंब्यासाठी खूप आभार.' मलायकाची ही पोस्ट सध्या व्हायरल होत असून कलाकारांच्या खूप कमेंट येत असून श्रद्धांजली दिली आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वाहतूक कोंडीतून होणार सुटका, पुणे पोलिसांची ट्रॅफिकक्युअर प्रणाली काय? Video
सर्व पहा

दरम्यान, मलायकाचे वडील अनिल अरोरा यांनी आत्महत्या केली आहे. अनिल अरोरा यांनी बुधवारी म्हणजेच आज सकाळी इमारतीच्या बाल्कनीतून उडी मारली. या घटनेने सध्या सगळीकडे खळबळ उडाली असून अरोरा कुटुंबाला तर मोठा धक्काच बसला आहे. अनिल अरोरा यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त केला असून याविषयी अधिक तपास सुरू आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक टीम देखील उपस्थित आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Malaika Arora Father Death: वडिल अनिल अरोराच्या निधनानंतर मलायकाची पहिली पोस्ट, म्हणाली...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल