छोट्या पडद्यासह रुपेरी पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रुचिरा जाधव (Ruchira Jadhav) सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. आपले वेगवेगळ्या लुकमधले फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. बिकीनीमधले फोटो शेअर केल्यावर तिला प्रचंड ट्रोल केलं जातं. याबद्दल लोकशाहीला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने आपलं मत मांडलं आहे. बिकीनी फोटोवरील ट्रोलिंगवर रुचिरा म्हणाली,"सोशल मीडियावर मी कृष्णाच्या मंदिरात गेल्यावर तिथले फोटो शेअर करते. तसेच मी बिचवर गेले तर तिथले बिकीनीमधले फोटोही शेअर करते. तर लोक का मिक्स का करत आहेत. दोन वेगवेगळ्या पोस्ट आहेत. त्यामुळे माझ्या इसकॉनमधल्या फोटोवर तुम्ही इसका बाकी का प्रोफाईल देखो, अशा कमेट्स करू शकत नाही".
advertisement
OTT Suspense Thriller: सस्पेन्स इतका की झोप उडेल, दृश्यमपेक्षा 'बाप' आहेत हे 5 थ्रिलर सिनेमे; पाहून व्हाल सुन्न
रुचिरा पुढे म्हणाली,"ती सुद्धा मी आहे आणि ही सुद्धा मी आहे. दोन्ही बाजू कशा सांभाळाच्या हे मला बरोबर माहिती आहे. कुठे काय घालायचं हे मला माहिती आहे. मी मंदिरात साडी किंवा ड्रेस घालून जाते. कधीकधी शूटिंग लवकर संपलं असेल तर मी नीट प्रेझेंटेबल कपडे घालून म्हणजे जीन्स-टॉपवर एक स्कार्फ गुंडाळूनही जाते. कारण देवाला माझा भाव महत्त्वाचा आहे. मंदिरात जाताना काय घालायचं आणि काय नाही घालायचं हे मला माहिती आहे. बिचवर काय घालायचं आणि काय नाही हे मला माहिती आहे. त्यामुळे या दोन गोष्टी मिक्स करू नये".
रुचिरा जाधवने 2016 मध्ये मराठी इंडस्ट्रीत 'तुझ्या वाचुन करमेना' या मालिकेच्या माध्यमातून पदार्पण केलं. 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वातही ती सहभागी झाली होती. आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांत तिने काम केलं आहे. अभिनेत्रीच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना आता उत्सुकता आहे.