तीन कपूरसोबत तीन प्रोजेक्ट्समध्ये करणार काम
अजिंक्य देव यांनी सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. यातील एका फोटोमध्ये ते करिश्मा कपूरसोबत दिसत आहेत, दुसऱ्या फोटोमध्ये ते नीतू कपूर आणि सनी कौशलसोबत दिसत आहेत, तर तिसऱ्या फोटोंमध्ये ते रणबीर कपूरसोबत दिसत आहेत. अजिंक्य यांनी त्यांच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय, "गेल्या वर्षी तीन वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर तिन्ही कपूरसोबत शूट करणे खूपच आनंददायी होते. या सर्व प्रोजेक्ट्सच्या रिलीजची मी आतुरतेने वाट पाहत आहे."
advertisement
अजिंक्य यांच्या पोस्टवरून स्पष्ट होत आहे की ते लवकरच वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समधून कपूर कुटुंबीयांसोबत काम करणार आहेत. काही रिपोर्ट्सनुसार अजिंक्य देव लवकरच एका हिंदी वेबसीरिजमध्ये करिश्मा कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. त्याचबरोबर ते नीतू कपूर आणि सनी कौशलसोबत बिग बजेट हिंदी फिल्ममध्येही दिसणार आहेत. अजिंक्य यांनी याआधीही रणबीर कपूरसोबत फोटो शेअर केला होता, पण काही वेळातच त्यांनी तो फोटो डिलिट केला होता. त्यानंतर अजिंक्य देव रणबीरसोबत रामायण या फिल्ममध्ये दिसणार का अशा शंका व्यक्त केल्या जात होत्या. अशातच अजिंक्य यांनी पुन्हा हाच फोटो शेअर केल्याने या शंका आता खात्रीमध्ये रुपांतरीत झाल्या आहेत.
अजिंक्य देव यांनी त्यांच्या कारकिर्दीत मराठी सिनेसृष्टी गाजवली होती. येत्या वर्षात ते हिंदी सिनेमा आणि सीरिजमध्ये झळकणार असल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. चाहते या पोस्टवर अजिंक्य यांना शुभेच्छा देत आहेत.