TRENDING:

'त्या' अपमानामुळं जिद्दीनं शिकलो गाणं, सचिन पिळगावकर यांना कोण म्हणालं बेसुरा? Video

Last Updated:

गाण्याबाबत केलेला अपमान सचिनच्या इतक्या जिव्हारी लागला की त्यांनी वयाच्या 7 व्या वर्षीच गाणं शिकण्याचा निश्चय केला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मयुरी सर्जेराव, प्रतिनिधी
advertisement

मुंबई: प्रसिद्ध मराठी सिनेअभिनेते, उत्तम दिग्दर्शक, उत्तम डान्सर, उत्तम गायक, लेखक, अष्टपैलू कलाकार अशी सचिन पिळगावकर यांची ओळख आहे. सचिन यांच्या सिनेविश्वातले बरेच किस्से आपण ऐकले असतील, पण सचिन पिळगावकर हे गाण्याकडे कसे वळले? याबाबत अनेकांना माहिती नसेल. कुटुंबातीलच एकाने केलेल्या अपमानामुळे सचिन यांनी गाणं शिकण्याचा चंग बांधला आणि ते गाणं शिकले. खुद्द सचिन यांनीच ही आठवण सांगितली आहे.

advertisement

तो अपमान जिव्हारी लागला

सचिन पिळगावकरांचे आई-वडील दोघेही उत्तम गायक होते. एकदा लहानपणी सचिन पिळगावकर त्यांच्या आजोळी गेले असताना ते आईसोबत गायला बसले. सचिनचा आवाज ऐकून त्यांच्या मामांनी बेसुरा म्हणत त्यांना गाणं थांबवायला लावलं. गाण्याबाबत केलेला हा अपमान सचिनच्या इतक्या जिव्हारी लागला की त्यांनी वयाच्या 7 व्या वर्षीच गाणं शिकायचंच असा निश्चय केला आणि आज ते मोठे गायकही आहेत. "मामानं केलेल्या अपमानामुळे माझ्या आयुष्यात गाणं आलं. तसा मी खूप जिद्दी आहे. एखादी गोष्ट ठरवली की ती करतोच. तसं गाणंही मी जिद्दीनं शिकलो" असं म्हणत सचिन पिळगावकरांनी तो किस्सा सांगितला.

advertisement

View More

रामभक्तीत रंगले अभिनेते सचिन पिळगावकर, कसा आहे पहिल्याच भक्तीगीताचा अनुभव?, Video

सचिनच्या आवाजात भक्तीगीत

दरम्यान, श्री राम भक्ती शेमारू उत्सवा अंतर्गत सचिन पिळगावकर यांनी रामायणातील चौपाई गायल्या आहेत. सचिन पिळगावकरांनी गायलेल्या चौपाईंचा व्हिडीओ आणि ऑडिओ शेमारू भक्तीच्या युट्युब चॅनलवर प्रदर्शित करण्यात आला आहे. याच निमित्तानं घेतलेल्या मुलाखतीत सचिन पिळगावकरांनी हा किस्सा सांगितला.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
'त्या' अपमानामुळं जिद्दीनं शिकलो गाणं, सचिन पिळगावकर यांना कोण म्हणालं बेसुरा? Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल