शांत, निरागस वाटणारं गाव. जिथं अचानक विचित्र, भयानक घटना घडू लागतात. गूढ घटनांनी गावात भीतीचं सावट पसरलेलं आहे. अंधाराच्या गर्भात लपलेली एक अनोळखी कहाणी. जिचं सत्य आजवर कुणालाच कळलेलं नाही. या रहस्यमयी गावात अचानक येते ती आणि घटनांचा वेगच बदलून टाकते.
टीझरच्या सुरुवातीला एक भयावह संगीत ऐकायला येतं. अंधारात एक छोटा मुलगा बॅटरी घेऊन शोधत असल्याचं दिसतं. पुढे ऐकायला मिळतं की, "गेल्या काही महिन्यांपासून आपल्या गावात ज्या काही घटना घडत आहेत त्या खूप भयानक आहेत". त्यानंतर लहान मुलं शाळेत जात असल्याचं दिसतं, तसंच रक्तपातही पाहायला मिळतो.
advertisement
मोदीजी, फडणवीस साहेब मदत करा! मराठी अभिनेत्रीचा मुलगा युद्धामुळे कुवेतमध्ये अडकला, परिस्थिती गंभीर
पुढे ऐकायला येतं की, "गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे". त्यानंतर एक मुलगी पाण्यात बुडताना दिसत आहे. कोणाचातरी मृत्यू होतो. गावात पोलीस येतात. त्यानंतर काही भयावह दृश्ये दिसतात.
पुढे लागोपाठ फिल्ममधील कलाकार दाखवण्यात आले आहेत. यामध्ये भारत गणेशपुरे, ओंकार भोजने, रोहित कोकाटे, अनिल नगरकर, प्रवीण डाळिंबकर, कमलाकर सातपुते, अंशुमन विचारे, चित्तरंजन गिरी, माधव अभ्यंकर, शशांक शेंडे यांचा समावेश आहे. हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत, त्यांचे लूक या टीझरमध्ये दिसत आहेत.
मनोरंजन विश्वात खळबळ! अभिनेत्री उर्मिलाने केली हत्या; बॉयफ्रेंडसाठी लिव्ह इन पार्टनरला संपवलं
टीझरच्या शेवटी एक महिला पोलीस अधिकारी दिसते, पण ती पाठमोरी दाखवण्यात आली आहे, तिचा चेहरा दिसत नाही. ही या फिल्मची अभिनेत्री, पण ती कोण? फिल्ममधील कथेप्रमाणेच तिची ओळखही रहस्यमयी ठेवण्यात आली आहे.
ती नेमकी कोण? तिचा या घटनांशी काय संबंध? ती सत्य शोधायला आली आहे की स्वतःच एखादं गूढ घेऊन? असे किती तरी प्रश्न निर्माण होतात. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि चित्रपटप्रेमींमध्ये याच प्रश्नाची जोरदार चर्चा रंगली आहे.
ही भूमिका कोण साकारणार हे अद्याप समोर आलेलं नाही. मराठीतील एका ग्लॅमरस अभिनेत्रीचं नाव या भूमिकेसाठी चर्चेत असल्याने उत्सुकता आणखी वाढली आहे. तिची ओळख गुप्त ठेवण्यात आली असली तरी तिची झलक पाहण्यासाठी चाहत्यांची आतुरता शिगेला पोहोचली आहे.s
गाव, गूढ आणि रहस्याने व्यापलेली कथा. अनपेक्षित वळणं, थरारक प्रसंग आणि शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी पटकथा. सालबर्डी हा चित्रपट येत्या 17 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रमेश चौधरी यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे आणि दिग्दर्शन केलं आहे.
