मोदीजी, फडणवीस साहेब मदत करा! मराठी अभिनेत्रीचा मुलगा युद्धामुळे कुवेतमध्ये अडकला, परिस्थिती गंभीर
- Published by:Priya Lad
Last Updated:
Vishaka Subhedar Son : अमेरिका आणि इस्राइलने इराकवर केलेल्या हल्ल्याचा परिणाम यूएईमध्ये झाला आणि त्यामुळे कित्येक भारतीय तिथं अडकले आहेत. यात मराठी अभिनेत्रीच्या मुलाचाही समावेश आहेत.
चेहऱ्यावर भीती, डोळ्यांतून घळाघळा अश्रू, हात जोडले... एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सोशल मीडियावर आपला व्हिडीओ पोस्ट केला आहे. या अभिनेत्रीचा मुलगा कुवेतमध्ये अडकला आहे. अमेरिका आणि इस्राइलने इराकवर केलेल्या हल्ल्याचा परिणाम यूएईमध्ये झाला आणि त्यामुळे कित्येक भारतीय तिथं अडकले आहेत. यात मराठी अभिनेत्रीच्या मुलाचाही समावेश आहेत.
ही अभिनेत्री आहे विशाखा सुभेदार. जिने फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात तिने तिचा मुलगा कुवेतमध्ये अडकल्याचं सांगितलं आहे. विशाखा म्हणाली , "माझा मुलगा लंडनला प्रवासाला निघाला होता. पण ले-ओव्हरमुळे कुवेतला त्याचं फ्लाइट उतरवण्यात आलं. विमानं रद्द केली आहेत. माझा मुलगा गेली 4 दिवस कुवेतमध्ये अडकला आहे. आता तिथली परिस्थीत गंभीर होत चालली आहे. तो स्वत: तिथं अनुभवतो आहे"
advertisement
"आता एका हॉटेलमध्ये एअरलाइन्सने त्याची व्यवस्था केली आहे. पण जसं दुबईच्या लोकांना परत आणलं तसं कुवेतमध्ये अडकलेल्यांनाही परत आणावं अशी माझी कळकळीची विनंती आहे", असं ती म्हणाली आहे.
दुबईत अडकलेले भारतीय सेलिब्रिटी
विशाखा सुभेदारचा मुलगा केवतमध्ये तर कित्येक भारतीय सेलिब्रिटी दुबईत अडकले आहेत. यामध्ये बॉलीवूडची ग्लॅमरस अभिनेत्री ईशा गुप्ता, 'जन्नत' फेम सोनल चौहान, टीव्ही प्रसिद्ध अभिनेत्री एरिका फर्नांडिस आणि टीव्ही अभिनेता रोहन गंडोत्रा, साऊथ स्टार अजित कुमार आणि विष्णु मंचू, 'बिग बॉस' फेम कपल कीथ सेक्वेरा आणि रोशेल राव, बंगाली अभिनेत्री सुभाषश्री गांगुली यांचा समावेश आहे.
advertisement
हल्ल्यात भारतीयाचा मृत्यू
सोमवारी मस्कतच्या किनाऱ्याजवळ ओमानच्या आखातात मार्शल आयलंड्सच्या ध्वजाखाली नोंदणीकृत असलेल्या तेलवाहू जहाजावर स्फोटकांनी भरलेल्या ड्रोन बोटीने हल्ला केला. या हल्ल्यात एका खलाशाचा मृत्यू झाला असून जहाजाला आग लागल्याची माहिती AFPने दिली आहे.
ओमानच्या सरकारी वृत्तसंस्थेने Oman News Agency, या जहाजाची ओळख MKD VYOM अशी पटवून दिली असून मृत खलाशी भारतीय नागरिक असल्याची पुष्टी केली आहे.
advertisement
अमेरिका-इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर आणि त्याला तेहरानकडून मिळालेल्या प्रत्युत्तराच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाला आहे. मात्र या हल्ल्यासाठी जबाबदार कोण, हे तात्काळ स्पष्ट झालेले नाही.
Location :
Maharashtra
First Published :
Mar 03, 2026 1:31 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
मोदीजी, फडणवीस साहेब मदत करा! मराठी अभिनेत्रीचा मुलगा युद्धामुळे कुवेतमध्ये अडकला, परिस्थिती गंभीर









