advertisement

Salbardi : रहस्यमयी मराठी फिल्म, जिची अभिनेत्रीच बनलीये एक रहस्य! 'सालबर्डी'तील अंधारातील गूढ शोधायला आलेली 'ती' कोण

Last Updated:

Marathi Film Salbardi Teaser : नुकताच एका मराठी फिल्मचा टिझर रिलीज झाला आहे. ही एक रहस्यमयी फिल्म आहे. पण या फिल्मचा टिझर पाहिल्यानंतर त्यातील अभिनेत्री सगळ्यांसाठी रहस्य बनली आहे.

News18
News18
6 मार्च रोजी तिघी ही मराठी फिल्म रिलीज होते आहे. त्यामुळे सध्या या फिल्मची चर्चा होते आहे. यादरम्यान आणखी एका नव्या फिल्मची भर पडली आहे.  नुकताच या फिल्मचा टिझर रिलीज झाला आहे. ही एक रहस्यमयी फिल्म आहे. पण या फिल्मचा टिझर पाहिल्यानंतर त्यातील अभिनेत्री सगळ्यांसाठी रहस्य बनली आहे.
शांत, निरागस वाटणारं गाव. जिथं अचानक विचित्र, भयानक घटना घडू लागतात. गूढ घटनांनी गावात भीतीचं सावट पसरलेलं आहे. अंधाराच्या गर्भात लपलेली एक अनोळखी कहाणी. जिचं सत्य आजवर कुणालाच कळलेलं नाही. या रहस्यमयी गावात अचानक येते ती आणि घटनांचा वेगच बदलून टाकते.
टीझरच्या सुरुवातीला एक भयावह संगीत ऐकायला येतं. अंधारात एक छोटा मुलगा बॅटरी घेऊन शोधत असल्याचं दिसतं. पुढे ऐकायला मिळतं की, "गेल्या काही महिन्यांपासून आपल्या गावात ज्या काही घटना घडत आहेत त्या खूप भयानक आहेत". त्यानंतर लहान मुलं शाळेत जात असल्याचं दिसतं, तसंच रक्तपातही पाहायला मिळतो.
advertisement
पुढे ऐकायला येतं की, "गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे". त्यानंतर एक मुलगी पाण्यात बुडताना दिसत आहे. कोणाचातरी मृत्यू होतो. गावात पोलीस येतात. त्यानंतर काही भयावह दृश्ये दिसतात.
पुढे लागोपाठ फिल्ममधील कलाकार दाखवण्यात आले आहेत. यामध्ये भारत गणेशपुरे, ओंकार भोजने, रोहित कोकाटे, अनिल नगरकर, प्रवीण डाळिंबकर, कमलाकर सातपुते, अंशुमन विचारे, चित्तरंजन गिरी, माधव अभ्यंकर, शशांक शेंडे यांचा समावेश आहे. हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत, त्यांचे लूक या टीझरमध्ये दिसत आहेत.
advertisement
टीझरच्या शेवटी एक महिला पोलीस अधिकारी दिसते, पण ती पाठमोरी दाखवण्यात आली आहे, तिचा चेहरा दिसत नाही. ही या फिल्मची अभिनेत्री, पण ती कोण? फिल्ममधील कथेप्रमाणेच तिची ओळखही रहस्यमयी ठेवण्यात आली आहे.
ती नेमकी कोण? तिचा या घटनांशी काय संबंध? ती सत्य शोधायला आली आहे की स्वतःच एखादं गूढ घेऊन? असे किती तरी प्रश्न निर्माण होतात.  गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि चित्रपटप्रेमींमध्ये याच प्रश्नाची जोरदार चर्चा रंगली आहे.
advertisement
ही भूमिका कोण साकारणार हे अद्याप समोर आलेलं नाही. मराठीतील एका ग्लॅमरस अभिनेत्रीचं नाव या भूमिकेसाठी चर्चेत असल्याने उत्सुकता आणखी वाढली आहे. तिची ओळख गुप्त ठेवण्यात आली असली तरी तिची झलक पाहण्यासाठी चाहत्यांची आतुरता शिगेला पोहोचली आहे.s
गाव, गूढ आणि रहस्याने व्यापलेली कथा. अनपेक्षित वळणं, थरारक प्रसंग आणि शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी पटकथा. सालबर्डी हा चित्रपट येत्या 17 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रमेश चौधरी यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे आणि दिग्दर्शन केलं आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Salbardi : रहस्यमयी मराठी फिल्म, जिची अभिनेत्रीच बनलीये एक रहस्य! 'सालबर्डी'तील अंधारातील गूढ शोधायला आलेली 'ती' कोण
Next Article
advertisement
IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement