रणवीर सिंगच्या Dhurandhar 2 ला ग्रहण! ट्रेलरच्या रिलीज डेटमध्ये शेवटच्या क्षणी मोठा बदल; सस्पेन्स वाढला
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
आधी ठरल्याप्रमाणे आज, ३ मार्च रोजी हा ट्रेलर धमाका करण्यासाठी सज्ज होता. मात्र, चाहत्यांच्या उत्साहावर विरजण पडलं असून ट्रेलरच्या रिलीज डेटमध्ये ऐनवेळी बदल करण्यात आला आहे.
मुंबई : बॉलिवूडचा एनर्जी मॅन रणवीर सिंग सध्या आपल्या आगामी चित्रपटाच्या, म्हणजेच 'धुरंधर: द रिव्हेंज' (Dhurandhar 2) च्या प्रमोशनमध्ये गुंतला आहे. चाहत्यांमध्ये या चित्रपटाच्या ट्रेलरची इतकी क्रेझ आहे की, प्रत्येक सेकंदाला 'ट्रेलर कधी येतोय?' याचीच वाट पाहिली जातेय. आधी ठरल्याप्रमाणे आज, ३ मार्च रोजी हा ट्रेलर धमाका करण्यासाठी सज्ज होता. मात्र, चाहत्यांच्या उत्साहावर विरजण पडलं असून ट्रेलरच्या रिलीज डेटमध्ये ऐनवेळी बदल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या विलंबामागे कोणत्याही तांत्रिक कारणापेक्षा आजचं ग्रहण कारणीभूत असल्याचं समजतंय.
'धुरंधर: द रिव्हेंज'च्या ट्रेलरला ग्रहण
बॉलिवूड हंगामाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, ३ मार्च रोजी ट्रेलर रिलीज करण्याची जय्यत तयारी झाली होती. मात्र, आज असलेल्या चंद्रग्रहणाने या प्लॅनमध्ये अडथळा आणला आहे. भारतीय परंपरेनुसार, ग्रहणाच्या काळात कोणतीही नवीन किंवा मोठी सुरुवात करणं अशुभ मानलं जातं.
मिळालेल्या माहितीनुसार, ग्रहणाचा काळ सकाळी ९:३९ पासून संध्याकाळी ६:४६ पर्यंत आहे. चित्रपटाचे ट्रेलर सहसा दुपारच्या वेळी लाँच केले जातात, जो काळ नेमका ग्रहणाच्या सूतक काळात येतो. जिओ स्टुडिओज आणि मेकर्सनी कोणताही धोका पत्करायचा नाही असं ठरवत, ट्रेलरचं लाँचिंग पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
advertisement
advertisement
आता कधी दिसणार 'धुरंधर'ची झलक?
ट्रेलर लाँचच्या नियोजनात झालेला हा काही पहिला बदल नाही. सुरुवातीला अंबानींच्या 'NMACC' मध्ये एक ग्रँड इव्हेंट होणार होता, जो नंतर रद्द करून डिजिटल लाँचचं ठरलं. आता ग्रहणामुळे पुन्हा एकदा तारीख बदलली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आता हा ट्रेलर ५ मार्च रोजी कोणत्याही मोठ्या सोहळ्याशिवाय थेट डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाऊ शकतो. मात्र, अद्याप मेकर्सनी यावर अधिकृत शिक्कामोर्तब केलेलं नाही.
advertisement
advertisement
बॉक्स ऑफिसवर 'टॉक्सिक'शी महामुकाबला
'धुरंधर २' ची लढाई केवळ पाकिस्तानच्या क्रिमिनल सिंडिकेटशी नाही, तर बॉक्स ऑफिसवर साऊथच्या 'रॉकिंग स्टार' यशशीही असणार आहे. यशचा 'टॉक्सिक' हा चित्रपट आणि 'धुरंधर २' हे दोन्ही सिनेमे १९ मार्च २०२६ रोजी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.
जिथे 'धुरंधर'च्या ट्रेलरवर सस्पेन्स कायम आहे, तिथे 'टॉक्सिक'च्या मेकर्सनी आपली रणनीती स्पष्ट केली आहे. गीतू मोहनदास दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर ८ मार्च रोजी बेंगळुरूमध्ये एका भव्य सोहळ्यात लाँच केला जाणार आहे. आता ट्रेलरच्या या लढाईत कोण बाजी मारतं, हे पाहणं रंजक ठरेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 03, 2026 3:10 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
रणवीर सिंगच्या Dhurandhar 2 ला ग्रहण! ट्रेलरच्या रिलीज डेटमध्ये शेवटच्या क्षणी मोठा बदल; सस्पेन्स वाढला










