Kitchen Tricks : कितीही लसूण असो, काही मिनिटांत सोलाला जाईल! 1-2 नव्हे तर 6 भन्नाट ट्रिक्स, कोणतीही वापरा
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
How to peel garlic fast : लसूण सोलणं हे स्वयंपाक घरातलं सर्वात अवघड काम आहे. अवघड यासाठी की त्याला खूप वेळा लागतो आणि खरं तर रोज लसूण निसनं हे खूप कंटाळवाणंही असतं. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी काही भन्नाट ट्रिक्स घेऊन आलो आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही काही मिनिटांत लसूण सोलू शकाल.
advertisement
लसूण सोलण्याची एक पद्धत असते ती म्हणजे, एखाद्या डब्यात किंवा जरमध्ये लसूण घेऊन तो वेगाने शेक करणे. लसणाच्या पाकळ्या एका मोठ्या काचेच्या किंवा स्टीलच्या डब्यात टाका. झाकण घट्ट बंद करा आणि 20-30 सेकंद वेगाने डबा हलवा. असे केल्याने लसणाची साल सैल होईल आणि निघू लागेल. डबा उघडल्यावर तुम्हाला बहुतांश लसूण सोललेला मिळे. या पद्धतीने तुम्ही 10-15 मिनिटांत अंदाजे एक किलो लसूण सोलू शकते.
advertisement
दुसऱ्या पद्धतीने तुम्ही पाण्यात टाकून लसूण सोलू शकता. लसूण थोडा कोरडा किंवा जुना असल्यास ही पद्धत जास्त उपयुक्त ठरते. लसणाच्या पाकळ्या कोमट पाण्यात 8-10 मिनिटे भिजवा. पाण्याच्या उष्णतेमुळे साले मऊ होते. नंतर बोटांनी पाकळ्या हलक्या दाबा किंवा घासा. साल लगेच वेगळी होण्यास सुरुवात होईल आणि कजास्त कष्ट घ्यावे लागणार नाहीत.
advertisement
advertisement
कोमट पाण्याव्यतिरिक्त तुम्ही थंड पाणी वापरूनही लसूण सोलू शकता. यासाठी एका मोठ्या भांड्यात एक लसणाच्या पाकळ्या ठेवा आणि त्यात थंड पाणी टाका. 5-6 तास किंवा रात्रभर सोडा. पाण्यात भिजवल्याने साल सैल होते. लसूण पाण्यात हाताने घासल्यासही साल सहज निघू लागते. साल पाण्यात वर येते आणि पाकळ्या तळाशी राहतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement









